Navnath Ban : मोर्चाच्या आक्रोशामुळे विरोधकांच्या कानठळ्या बसल्या आहेत - नवनाथ बन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशद्रोह्यांना धडा शिकवणारे देशभक्त आहेत.
22-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Navnath Ban) "भारतीय जनता पक्षाने काढलेल्या महिला मोर्चाबद्दल बोलत असताना संजय राऊत यांनी घिसाडघाई हा शब्द वापरला आहे.एखाद्या जातीचा अपमान करण्याचे काम सातत्याने उबाठा आणि संजय राऊत यांच्याकडून केले जाते. संजय राऊत यांना याची लाज वाटली पाहिजे. दि.२१ रोजी महिलांनी काढलेल्या या मोर्चाच्या आक्रोशामुळे विरोधकांच्या कानठळ्या बसल्या आहेत. त्यामुळे कालपासून संजय राऊत, रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ यांची बडबड सुरू आहे. मोर्चातील लहान लहान गोष्टी काढून विरोध करण्याचे काम महाविकास आघाडी कडून सुरू आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना या महिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत." असे परखड मत भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवार दि.२२ रोजी व्यक्त केले. (Navnath Ban)
"जनतेने विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या पक्षाला चंदन लावलेले आहे. तर नारीशक्तीला वंदन करण्याचे काम भाजप आणि महायुतीने केले आहे. महिला विरोधी वक्तव्य करायची, महिला विरोधी धोरण राबवायच आणि सामान्य महिलांना संसदेत जाण्यापासून रोखायचे हे काम राहुल गांधी यांनी केले आहे. त्यामुळे एक नाही दोन नाहीतर तीन निवडणुकीत राहुल गांधी यांना जनतेने चंदन लावले आहे. नारीशक्ती महायुतीच्या बाजूने आहे का नाही हे विधानसभेच्या, जिल्हा परिषद ,नगरपालिका, नगरपरिषद निकालातून स्पष्ट झाले आहे.नारीशक्तीने कायम भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ दिली आहे." असेही बन यांनी स्पष्ट केले. (Navnath Ban)
"मोर्चाला हजार रुपये द्यायची परंपरा उबाठा आणि महाविकास आघाडीची असेल. पैसे देऊन मोर्चाला लोक बोलवणे हे मविआ आणि उबाठामध्ये सातत्याने होते. नारीशक्तीच्या सन्मानासाठी भाजपने हा मोर्चा काढला होता त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकर महिला या मोर्चात सहभागी झाल्या. तसेच लाडक्या बहिणीला जे पंधराशे रुपये मिळतात ते मिळू नयेत यासाठी संजय राऊत सातत्याने पंधराशे रुपयेचा उल्लेख करतात." असेही बन यांनी सुनावले. (Navnath Ban)
"आकडे लावायची सवय राऊत यांना आहे. भोंदूबाबा खरात नंतर संजूबाबा राऊत यांनी हा नवा धंदा सुरू केला आहे. खरातला बेड्या ठोकण्याच काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी १४० कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत. ज्या पुलवामामध्ये घटना घडली त्या पुलवामाच समर्थन काँग्रेसने केल होत. दहशतवादी जिवंत आहेत असे संजय राऊत यांनी सांगितले होते. आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचे काम आपल्या भारतीय सैन्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशद्रोह्यांना धडा शिकवणारे देशभक्त आहेत." असेही बन यांनी सुनावले.