मुंबई : (Navi Mumbai Logistics Park) महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. अशावेळी मुंबई ३.० च्या विकासालाही गती आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईत आता लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीला गती मिळते आहे. सिडकोच्या माध्यमातून लॉजिस्टिक पार्कची अनेक वर्षांची संकल्पना आता प्रत्यक्षात आकार घेत आहे.(Navi Mumbai Logistics Park)
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसोबत असलेले सान्निध्य तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, प्रस्तावित मल्टी-मोडल कॉरिडॉर तसेच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांमुळे लाभलेल्या उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीमुळे नवी मुंबई एक प्रमुख लॉजिस्टिक्स हब म्हणून उदयास येत आहे.(Navi Mumbai Logistics Park)
या धोरणात्मक संधीचा लाभ घेण्यासाठी सिडकोने पुष्पक नोडमधील चिर्ले गावाजवळ सुमारे ३७४ हेक्टर जमीन एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क (आयएलपी) विकसित करण्यासाठी राखीव ठेवली आहे. या प्रकल्पांतर्गत विकसित होणारऱ्या क्षेत्रावर आवश्यक पायाभूत सुविधा, सामाजिक सुविधा, सामायिक सुविधा आणि उपयुक्तता जाळ्यांचा समावेश असेल.(Navi Mumbai Logistics Park)
या प्रकल्पासाठी जमीन वाटप, विकास आणि वितरण हे महाराष्ट्र शासनाच्या एमआयडीसी पास-थ्रू धोरणानुसार करण्यात येणार आहे. यासाठी सविस्तर मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून संपूर्ण क्षेत्र सात लॉजिस्टिक्स झोनमध्ये विभागण्यात आले आहे. सर्व भूखंडांना सुलभ जोडणी मिळावी यासाठी ४५ मीटर आणि ३० मीटर रुंदीच्या रस्त्यांचे प्राथमिक जाळे प्रस्तावित करण्यात आले आहे.(Navi Mumbai Logistics Park)
प्राथमिक टप्प्यात, सिडकोने स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे लँड पार्सल एल-१ मधील सुमारे ७२ हेक्टर (१७९.२९ एकर) क्षेत्रातील १२ भूखंडांसाठी स्वारस्य अभिव्यक्ती आमंत्रित केली आहे. या प्रकल्पासाठी रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था, मलनिस्सारण जाळे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधा सिडकोकडून विकसित करण्यात येतील.(Navi Mumbai Logistics Park)
निवड प्रक्रियेनंतर, यशस्वी अर्जदार आणि सिडको यांमध्ये सामंजस्य करार (एमओयू) करण्यात येईल, ज्यामध्ये संबंधित भूखंडाच्या शुल्क भरणा आणि अधिग्रहणासंबंधी अटी नमूद असतील. महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण आणि त्यातील पुढील अद्ययावतीकरणांनुसार या प्रकल्पांतर्गत लॉजिस्टिक्स आणि संबंधित लाइट इंडस्ट्रीज, वेअरहाउसिंग, लॉजिस्टिक्स पार्क, कंटेनर फ्रेट स्टेशन, इनलँड कंटेनर डेपो आणि इतर पायाभूत सुविधा विकसित करण्यात येतील.(Navi Mumbai Logistics Park)
“जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मजबूत प्रादेशिक कनेक्टिव्हिटी यांसारख्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह नवी मुंबईत हे लॉजिस्टिक्स व संबंधित उद्योगांसाठी नैसर्गिक केंद्र म्हणून आकार घेत आहे. याद्वारे सिडको कार्यक्षम मालवाहतूक सुलभ करणारी, गुंतवणूक आकर्षित करणारी आणि आर्थिक विकासाला चालना देणारी भविष्याभिमुख परिसंस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे."(Navi Mumbai Logistics Park)
- विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.