Mumbai University Paper Leak : अभाविप ने घेतली मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट

पेपर फुटी संदर्भात दिले निवेदन

    22-Apr-2026
Total Views |
Mumbai University Paper Leak
 
मुंबई : (Mumbai University Paper Leak) मुंबई विद्यापीठातील पेपर फुटी संदर्भात अभाविप च्या शिष्टमंडळाने बुधवार दि.२२ रोजी घेतली उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यात एकूण चार मागण्या आहेत व त्या पुढीलप्रमाणे : 
 
१.संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी तात्काळ जाहीर करण्यात यावी.
 
२.प्रश्नपत्रिका लीकमध्ये सहभागी असलेल्या सर्व संबंधित अधिकारी, परीक्षा नियंत्रक, आयटी समन्वयक व कर्मचाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे.
 
३. संबंधित सर्व परीक्षा तात्काळ रद्द करून पुनर्परीक्षेची स्पष्ट व अधिकृत घोषणा करण्यात यावी.
 
४. प्रकरणाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करून पारदर्शकता राखण्यात यावी आणि निर्दोष विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची लेखी हमी द्यावी.
 
वरील सर्व मागण्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले.(Mumbai University Paper Leak)
 
मुंबईतील आर. डी. नॅशनल कॉलेज, बांद्रा तसेच विविध महाविद्यालयांमध्ये घडलेले प्रश्नपत्रिका लीक प्रकरण हे केवळ निष्काळजीपणाचे उदाहरण नसून, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेचे उघड दर्शन आहे. दि. १५ एप्रिल रोजी अंतिम वर्षाच्या सहाव्या सत्रातील तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच बाहेर येणे ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना आहे असे अभाविप चे म्हणणे आहे.(Mumbai University Paper Leak)