law and order for gardens : उद्याने व मैदानांमध्ये असामाजिक घटकांचा वाढता वावर!

पोलिस गस्त वाढवण्याची मागणी

    22-Apr-2026
Total Views |
securiy of gardens
 
मुंबई : ( law and order for gardens ) शहरातील उद्याने, मनोरंजन मैदाने आणि खेळाच्या मैदानांमध्ये सायंकाळनंतर असामाजिक तत्वांचा वावर वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अंमली पदार्थांचे सेवन, मद्यपान, दादागिरी आणि इतर समाजविघातक प्रकार घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून सार्वजनिक ठिकाणांची शांतता धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाजार व उद्यान समिती अध्यक्षा हेतल विमल गाला यांनी याकडे पोलिसांचे लक्ष वेधले आहे.
 
उद्याने आणि मैदानांमध्ये वाढत्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी हेतल गाला यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे.(law and order for gardens)
 
मुंबईत सध्या सुमारे ३२५ उद्याने, ३६९ खेळाची मैदाने आणि ४८० मनोरंजन मैदाने आहेत. नागरिकांना मोकळी, स्वच्छ व सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे आणि हरित क्षेत्र टिकवून ठेवणे हे महापालिकेचे धोरण आहे. मात्र, काही ठिकाणी सायंकाळनंतर निर्माण होणाऱ्या असुरक्षित वातावरणामुळे नागरिक या सुविधांचा पूर्ण लाभ घेऊ शकत नाहीत.
 
हेही वाचा :  Water supply : मुंबईत काही भागांत गुरुवारी पाणीपुरवठा बंद; शिवडीत बटरफ्लाय व्हॉल्व बसविणार
 
सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था (law and order for gardens)राखण्यासाठी आणि नागरिकांना निर्धास्तपणे उद्याने व मैदानांचा वापर करता यावा यासाठी रात्रीच्या वेळी नियमित पोलिस गस्त (पेट्रोलिंग) वाढविणे अत्यावश्यक असल्याचे गाला यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.(law and order for gardens)