भाजपच्या महिला आक्रोश मोर्चात वादग्रस्त वर्तणूक करणाऱ्या 'त्या' महिलेबाबत काय म्हणाले गिरीश महाजन?

मोर्चाला रीतसर परवानगी होती, मार्ग ठरलेला होता

    22-Apr-2026
Total Views |

Girish Mahajan

 
मुंबई : (Girish Mahajan) "काँग्रेससह त्यांच्या विरोधी मित्र पक्षांनी महिला आरक्षण बिलाला विरोध केल्यामुळे मंगळवार दि.२१ रोजी मुंबईत हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. मोर्चा निघतात तेव्हा वाहतूक कोंडी होत असते मी या कोंडीचे समर्थन करीत नाही पण सर्वच पक्षांच्या मोर्चा वेळी वाहतूक कोंडी होत असते हे मान्यच करावे लागेल.

दिनांक २१ रोजी या मोर्चावेळी एका महिलेनेच तिथे येऊन मोर्चाविरोधात अनेक असंसदीय शब्द वापरले,बाटली फेकून मारली ते करायला नको होते. त्यांनी रीतसर पोलिसांकडे आपली तक्रार द्यायला हवी होती. पोलीस समजवत असताना सुद्धा त्या नको त्या भाषेत पोलिसांशी बोलत होत्या.आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली.
 
 मी त्यांना स्वतः समजावून सांगितले की आम्ही दहा-पंधरा मिनिटात निघून जात आहोत.मी माफी देखील मागितली तरीही त्या ऐकायला तयार नव्हत्या. मोर्चास रीतसर परवानगी होती मार्ग ठरलेला होता." असे स्पष्टीकरण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मंगळवारच्या मोर्चातील घटनेबाबत दि. २२ रोजी दिले.(Girish Mahajan)
 
हेही वाचा :  महिलांना राजकीय आरक्षण देणाऱ्या विधेयकास काँग्रेससह विरोधी पक्षांनी केलेला विरोध म्हणजे महिलांची स्वप्ने पायदळी तुडवण्याची काम म्हणावे लागेल
 
" मोर्चे, आंदोलने या देशात, राज्यात, मुंबईसारख्या शहरात सातत्याने निघत असतात.कोणताही मोर्चा असला तरी त्याची रीतसर परवानगी घेतली जाते. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. महिलेचा संताप होणे योग्यच आहे पण ती व्यक्त करण्याची एक पद्धत असते. इथून पुढे अशा गोष्टीवेळी आम्ही लोकांना त्रास होणार नाही याची नक्की काळजी घेऊ." असेही महाजन यांनी स्पष्ट केले.(Girish Mahajan)