Civil Service Day 2026 : ‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल ;

प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Total Views |
civil servise day
 
मुंबई : (Civil Service Day 2026) राज्यातील प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी ‘झिरो ब्युरोक्रसी’ची संकल्पना राबविण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागरी सेवा दिन 2026(Civil Service Day 2026) आणि ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’ अंतर्गत आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारख्या दृष्टिकोनातून कार्य करण्याची गरज आहे. प्रक्रियांचे पुनर्रचना करून त्या अधिक सुलभ, पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेप कमी करणाऱ्या असाव्यात. पात्र नागरिकांना थेट सेवा देणे हेच ‘झिरो ब्युरोक्रसी’चे मूळ तत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
राज्य शासनाने 100 व 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत प्रशासनातील कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला असून, त्यातील 85 टक्के उद्दिष्टे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ सुधारण्यासाठी विविध प्रक्रिया सुलभ करण्यात आल्या आहेत. ‘विकसित महाराष्ट्र 2047’ या दृष्टीकोनातून 2029, 2035 आणि 2047 असे टप्पे निश्चित करण्यात आले असून, महाराष्ट्र जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ‘आपले सरकार 2.0’च्या माध्यमातून नागरिकांना अधिक सुलभ सेवा देण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.(Civil Service Day 2026)
 
 
या कार्यक्रमात विविध स्तरांवरील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कृषी, मत्स्यव्यवसाय, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ई-गव्हर्नन्स, आरोग्य, शिक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील उपक्रमांना पुरस्कार देऊन प्रशासनातील कल्पकता आणि कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यात आले.(Civil Service Day 2026)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.