मुंबई : ( Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबई महानगराच्या वतीने आर. डी. नॅशनल कॉलेज, बांद्रा येथे दि. १५ एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाबाबत व्यवस्थेच्या निष्क्रियते विरोधात जाहीर जाब विचारण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय.बीकॉम (सेम.६) मधील तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच बाहेर येणे ही केवळ अनियमितता नसून संपूर्ण परीक्षा यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर बसलेला थेट आघात आहे. हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी उघडपणे खेळ करण्याचा आणि शैक्षणिक व्यवस्थेची थट्टा करण्याचा प्रकार असल्याचे अभाविपचे म्हणणे आहे.
अभाविपचा ( Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) आरोप आहे की, प्रकरण उघड होऊन अनेक दिवस उलटले तरी ना ठोस गुन्हा नोंद, ना पारदर्शक चौकशीचा अहवाल, ना जबाबदारी निश्चिती. उलट काही निवडक विद्यार्थ्यांवर कारवाई करून मूळ जबाबदार यंत्रणा स्वतःची पाठराखण करण्यात गुंतलेली असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. ही परिस्थिती अत्यंत संशयास्पद, अस्वीकार्य आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. ( Akhil Bharatiya Vidyarthi Parishad)
या प्रकरणातील प्रत्येक जबाबदार व्यक्ती विद्यार्थी, अधिकारी किंवा प्रशासकीय यंत्रणा यांना तात्काळ गुन्हे दाखल गेले पाहिजे. केवळ चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा करणारी मानसिकता यापुढे सहन केली जाणार नाही. संबंधित परीक्षा केंद्रातील मुख्य संचालक, आयटी समन्वयक आणि सर्व थेट जबाबदार अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन अनिवार्य आहे. संबंधित विषयांच्या परीक्षा तात्काळ रद्द करून पुनर्परीक्षेची ठोस आणि अधिकृत घोषणा केली गेली पाहिजे. स्वतंत्र, उच्चस्तरीय आणि पूर्णतः पारदर्शक चौकशी समिती तात्काळ गठित करण्यात यावी. संपूर्ण प्रकरणाची माहिती लपविणे किंवा दडपणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय असून तो कधीही सहन केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका अभाविपने घेतली आहे. ( Akhil Bharatiya Vidyarthi Parishad)
मुंबई महानगर मंत्री प्रशांत माळी म्हणले, मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय.बीकॉम (सेम.६) च्या ३ विषयांच्या प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा संशय आहे आणि या संशयाखाली विद्यापीठाने नेमलेल्या समितीने आर. डी. नॅशनल कॉलेज, वांद्रे येथे ६ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आणि आता जेव्हा महाविद्यालय प्राचार्या व विद्यापीठ परीक्षा नियंत्रक यांना विचारणा केली तर अस लक्षात येत की ते प्रकरण दाबायला भाग पाडत आहेत. यावर विद्यापीठ प्रशासनाने संशयितांवर लवकर गुन्हे दाखल करून कारवाई करावी आणि जर परीक्षा नियंत्रक उत्तर देण्यास सक्षम नसतील तर राजीनामा द्यावा. ( Akhil Bharatiya Vidyarthi Parishad)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक