मुंबई : (Umar Khalid case) दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद याला सर्वोच्च न्यायालयाकडून कडून मोठा धक्का बसलाय. न्यायालयाने उमर खालिदची पुनर्विचार याचिका फेटाळून लावलीय. न्यायालयाने स्पष्ट केले की, यापूर्वी दिलेल्या निर्णयात बदल करण्यासाठी कोणतेही ठोस कारण आढळले नाही.
प्रत्यक्षात, दि. ५ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने उमर खालिद (Umar Khalid case) यांना जामीन देण्यास नकार दिला होता. त्याच प्रकरणातील इतर पाच आरोपी जामीन मंजूर झाला होता. या निर्णयाविरोधात उमर खालिद यांनी १३ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यांच्या वकिलांनी या प्रकरणाची सुनावणी ओपन कोर्टमध्ये घेण्याची मागणी केली होती.
सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने उमर खालिदची याचिका फेटाळून लावत, पूर्वीचा निर्णय बदलण्यास कोणतेही ठोस कारण नसल्याचे नमूद केले. तसेच प्रकरणात पुन्हा सुनावणी घेण्याची मागणीही न्यायालयाने मान्य केली नाही.(Umar Khalid case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक