ST Corporation : एसटीची स्थानके सौर ऊर्जा संपन्न होणार

२.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

Total Views |
ST Corporation

मुंबई : (ST Corporation) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर ग्रीड सोलर ऊर्जा प्रणालीद्वारे वीज निर्मिती करून तीच ऊर्जा वापरण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ₹१३.०३ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली असून एसटीच्या ऊर्जावापरात मोठी बचत होऊन पर्यावरणपूरक पाऊल उचलले जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.(ST Corporation)
 
मंत्री सरनाईक म्हणाले की, या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या बसस्थानके, कार्यशाळा, कार्यालये आणि इतर आस्थापनांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढणार असून, दरवर्षी सुमारे ३ ते ४ कोटी रुपयांचा पारंपरिक वीज खर्च वाचणार आहे.(ST Corporation)
 
प्रकल्पाची अंमलबजावणी करताना नमुना नकाशे, तांत्रिक मान्यता आणि पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या आहेत. हा उपक्रम हरित ऊर्जा वापराच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यामुळे ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक शिस्त या तिन्ही बाबींमध्ये सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत.(ST Corporation)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.