मालवणच्या बंदरात कायद्याने संरक्षित गिटारफिश; कायद्याने संरक्षित प्रजातीच्या नोंदी

    21-Apr-2026
Total Views |

malvan fish market


मुंबई (अक्षय मांडवकर) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बंदरावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असलेले वाइडनोज गिटारफिश मोठ्या संख्येत आढळत आहेत (malvan fish market). दक्षिण फाऊंडेशनने संकलित केलेल्या माहितीवरुन ही बाब समोर आली आहे (malvan fish market). कायद्याने संरक्षित असलेले हे मासे इतर माशांची मासेमारी करतेवेळी मच्छिमारांच्या जाळ्यात अनपेक्षितपणे पकडले जात असले तरी, त्यांची त्याठिकाणी होणारी विक्री गंभीर आहे (malvan fish market). कारण, कायद्यानुसार या माशांना वाघाच्या दर्जाचे म्हणजेच प्रथम श्रेणीतील संरक्षण असून त्यांची पकड वा विक्रीस बंदी आहे. (malvan fish market)

 

 


गिटारफिश हे मोरी (शार्क) आणि वाघळी (स्टिंग रे) यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांचा संगम असलेले समुद्री मासे आहेत. भारतात गिटारफिशच्या १२ प्रजाती आढळतात. जगभरात हे मासे अत्यंत धोक्यात आलेल्या सागरी प्रजातींपैकी एक आहेत. कारण, ते हळू वाढतात आणि खूप कमी पिल्ले जन्मास घालतात. त्यामुळे अति-मासेमारीमुळे त्यांच्या संख्येला धोका निर्माण झाला आहे. दक्षिण फाऊंडेशनने २०२२ पासून संकलित केलेल्या माहितीनुसार त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात गिटारफिशच्या तीन प्रजातींची मासेमारी ही प्रामुख्याने होत असल्याचे लक्षात आले आहे. यामध्ये वाइडनोज गिटारफिश, बोमाउथ गिटारफिश आणि शार्पनोज गिटारफिश यांचा समावेश आहे. यामधील वाइडनोज आणि बोमाउथ या वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षित आहे. मालवण बंदरावर यामधील वाइडनोज गिटाऱफिश मोठ्या संख्येने आढळत असल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे.



संशोधकांनी संकलित केलेल्या माहितीनुसार, हंगामी दृष्ट्या मालवण बंदरावर वाइडनोज गिटारफिश ही प्रजाती वर्षभर आढळते. मात्र ऑक्टोबर ते मार्च या उत्तर-मान्सून व हिवाळी कालावधीत तिची नोंद तुलनेने अधिक आहे. भौगोलिकदृष्ट्या ही प्रजाती मालवण, तळाशील, देवबाग, तोंडवली आणि कवडा या भागांजवळील मासेमारी क्षेत्रांत व्यापकपणे आढळते. याउलट बोमाउथ गिटारफिश ही प्रजाती तुलनेने कमी प्रमाणात आढळते व तिच्या नोंदी मुख्यतः ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत, मालवण व झुवा परिसरातील मासेमारी क्षेत्रांपुरत्याच मर्यादित आहेत. तर शार्पनोज गिटारफीश ही प्रजाती वर्षभर तुलनेने सातत्याने आढळते, विशेषतः फेब्रुवारी ते मे आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तिची नोंद अधिक आहे. मालवण, आचरा, कवडा, तोंडवली आणि झुवा या विविध मासेमारी क्षेत्रातून ती नोंदवली गेली आहे.

 

अनपेक्षित पकड तरीही मासेमारीत वाढ

 

संकलित केलेल्या डेटाच्या प्राथमिक विश्लेषणातून असे दिसून येते की, गिटारफिश प्रजाती या किनारी मासेमारीत नियमितपणे बायकॅच (अनपेक्षित पकड) म्हणून आढळतात. त्यांची अनपेक्षित मासेमारी वाढत्या क्रमाने दिसून येते. या प्रजाती मुख्यतः लक्ष्यित मासेमारीसाठी नसून, मासे व क्रस्टेशियन (उदा. कोळंबी, खेकडे) पकडताना योगायोगाने पकडल्या जातात. – गरिमा बोरा, सिनिअर प्रोग्राम असोसिएट, दक्षिण फाऊंडेशन