Housing project ; वर्षभरात 10 हजारांपेक्षा जास्त गृहनिर्माण प्रकल्पांना विविध मंजुऱ्या

राज्यातील स्थावर संपदा क्षेत्राला चालना देण्यासाठी महारेरा सातत्याने कार्यरत

Total Views |
gruhnirman prakalp
 
मुंबई : (Housing project) राज्यातील स्थावर संपदा क्षेत्राला चालना देण्यासाठी महारेरा सातत्याने कार्यरत असून 2025-26 या आर्थिक वर्षात एकूण 10,379 गृहनिर्माण प्रकल्पांना विविध प्रकारच्या मंजुऱ्या देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती मिळून घर खरेदीदारांचे हित अधिक सक्षमपणे जपले जाणार आहे.
 
महारेराकडे प्रकल्प नोंदणी करताना विकासकांना प्रकल्प पूर्णतेची निश्चित मुदत जाहीर करावी लागते. काही कारणांमुळे प्रकल्प (Housing project) उशिरा पूर्ण होत असल्यास मुदतवाढ घेणे आवश्यक असते; अन्यथा प्रकल्प ‘लॅप्स’ होण्याचा धोका असतो. तसेच प्रकल्पातील बदल किंवा सुधारणा नियमित करण्यासाठी महारेराची पूर्वपरवानगी आवश्यक असते. ही प्रक्रिया पारदर्शकता, नियमन आणि ग्राहकहित जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. (Housing project)
 
हेही वाचा :  India Locomotive Export Mozambique : भारतीय रेल्वे इंजिन आफ्रिकेतील रेल्वेची गती वाढवणार
 
जिल्हानिहाय पाहता, पुणे जिल्हा 3,150 प्रकल्पांसह अव्वल स्थानावर असून त्यापाठोपाठ ठाणे (1,714), मुंबई उपनगर (1,696), रायगड (939) आणि पालघर (568) यांचा क्रमांक लागतो. विभागनिहाय आकडेवारीत मुंबई महानगर प्रदेश 5,494 प्रकल्पांसह आघाडीवर आहे, तर पुणे परिसरात 3,566 प्रकल्प नोंदवले गेले आहेत. विदर्भात 563 प्रकल्प असून त्यात नागपूरचा मोठा वाटा (474) आहे. खानदेशात 520 प्रकल्प असून नाशिक (454) प्रमुख आहे, तर मराठवाड्यात 203 प्रकल्पांपैकी संभाजीनगर (155) आघाडीवर आहे. (Housing project)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.