Health System : डेंग्यू-मलेरियाने पुन्हा काढले डोके वर

संसर्गजन्य आजारांत वाढ -हवामान बदलाचा फटका

    21-Apr-2026
Total Views |
health system update
 
मुंबई : (Health System) राज्यातील बदलत्या हवामानाचा थेट परिणाम आता सार्वजनिक आरोग्यावर दिसू लागला असून अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू व मलेरियासारख्या डासजन्य आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. वाढते तापमान, आर्द्रता आणि अनियमित पावसामुळे डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
 
गेल्या काही वर्षांत हवामानातील टोकाच्या बदलांमुळे आरोग्य यंत्रणेवर (Health System) मोठा ताण निर्माण झाला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस , तर दुसरीकडे दुष्काळाचे सावट अशा दुहेरी संकटामुळे संसर्गजन्य आजारांना पोषक वातावरण तयार होत आहे. विशेषतः शहरी आणि उपनगरी भागात साचलेले पाणी, अपुरी स्वच्छता आणि अनियमित पावसाचे चक्र यामुळे डासांची पैदास वाढत आहे. (Health System)
 
तज्ज्ञांच्या मते, केवळ औषधोपचार किंवा तात्पुरत्या उपाययोजनांनी ही समस्या नियंत्रणात येणार नाही. हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्था यांचा समन्वय साधून दीर्घकालीन धोरणांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा भविष्यात राज्याला अधिक गंभीर आरोग्य संकटाचा सामना करावा लागू शकतो.
 
 
डॉ. विजयकुमार सिंग ( प्रमुख, औषध विभाग, के. ई .एम रुग्णालय ) यांनी सांगितले की," डेंग्यू, मलेरिया हे डासांमुळे होणारे आजार आहेत आणि त्यामध्ये फॅल्सिपॅरम, विवॅक्स, ओव्हेल, आणि मलेरिए या सर्व प्रकारच्या मलेरियासाठी पूर्ण उपचार घेणे आवश्यक आहे.
 
यापैकी विवॅक्स, ओव्हेल आणि मलेरिया शेवटच्या तीन प्रकारांमध्ये प्रायमाक्विन उपचारासह १४ दिवसांचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे गरजेचे आहे. (Health System)
 
डेंग्यू रुग्णसंख्या (५ वर्षे)
 
२०२१ : १२,७२०
२०२२ : ८,५७८
२०२३ : १९,०३४
२०२४ : १९,३८५
२०२५ : १४,१५९
(एकूण : ७३,८७६)
 
मलेरिया रुग्णसंख्या (५ वर्षे)
 
२०२१ : १९,३०३
२०२२ : १५,४५१
२०२३ : १६,१५९
२०२४ : २१,०७८
२०२५ : २०,०००
(एकूण : सुमारे ९२,०००)