Gopalrao Patil death : लातूर पॅटर्न निर्माते आणि भाजप माजी खासदार गोपाळराव पाटील यांचे निधन
21-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Gopalrao Patil death) भाजप नेते आणि माजी खासदार डॉ.गोपाळराव पाटील यांचे मंगळवार दि.२१ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे. बालरोगतज्ञ आणि शिक्षणतज्ञ म्हणून त्यांची संपूर्ण राज्यात ओळख होती. शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लातूर पॅटर्नद्वारे शिक्षण क्षेत्रात मोठी भूमिका घडवली होती. त्यांनी १९९४ ते २००० या कालावधीत राज्यसभेत नेतृत्व केले होते.मराठवाड्यात भाजपचा पाया मजबूत करण्यात त्यांच मोठ योगदान मानले जाते.१९९१ ते ९९ दरम्यान त्यांनी (Gopalrao Patil death) चार वेळा लोकसभा निवडणूक लढवली. मंगळवार दि.२१ रोजी सायंकाळी ५ वाजता लातूर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलच्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोक व्यक्त करत म्हणाले की, "मराठवाड्यातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी डॉक्टर आणि अभियंता म्हणून घडवले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले होते."
लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की,"लातूरचा शैक्षणिक क्रांतीचा महामेरु हरपला आहे." (Gopalrao Patil death)