Drugs Free Mumbai : महिन्याचा कमीत कमी एक तास नशामुक्ती अभियानासाठी द्या - मंगलप्रभात लोढा

ड्रग्स फ्री मुंबई साठी वर्षभराचे नियोजित कार्यक्रम होणार

    21-Apr-2026
Total Views |
drugs free mumbai speaks mangaprabhat lodha
 
मुंबई : (Drugs Free Mumbai) "समाजातील प्रत्येक घटकाने, समाजसेवी संस्थेने , पालक, समाजसेवक यांनी महिन्यातील कमीत कमी एक तास नशामुक्ति अभियानासाठी, ड्रग्स मुक्त मुंबई साठी द्यावा. तसेच नशामुक्त मुंबई अभियान यशस्वी होण्यासाठी व्यापक जनसहभाग अत्यंत आवश्यक आहे.त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील सक्रिय सहभाग प्राप्त करून घेणे आणि मुंबई उपनगर क्षेत्रातील सर्व भागात ही मोहीम प्रभावीपणे राबवली जावी या हेतूने १ मे पासून दर महिन्याच्या पहिल्या रविवारी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात सहभाग नोंदवावा."असे आवाहन मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवार दि.२० रोजी केले.
 
१ मे २०२६ ते १ मे २०२७ कालावधीत 'नशा मुक्त मुंबई समाज शक्ती अभियान' राबविण्यात येणार असून याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते ,यावेळी आमदार अमित साटम उपस्थित होते.(Drugs Free Mumbai)
 
" मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ही बैठक आयोजित केली होती. मुंबई अगेन्स्ट ड्रग्स अशी मोहीम राबवली जाणार असून १ मे पासून प्रत्यके महिन्याला वेगळा कार्यक्रम घेतला जाईल. युवा पिढीत नशामुक्तिसाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी हे कार्यक्रम राबवले जातील.
 
हेही वाचा :  'Mumbai Against Drugs' Campaign : नशामुक्त मुंबईसाठी महाराष्ट्र दिन १ मे पासून वर्षभर 'मुंबई अगेन्स्ट ड्रग्स' मोहीम
 
यात समाजातील सर्व मान्यवरांना सहभागी करून घेतले जाईल. येणाऱ्या काळात प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यात असे कार्यक्रम राबवावे अशी आमची इच्छा असून रविवार दि.१९ रोजी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबाबत भेट घेतली आहे.इथून पुढे लाइव्ह कॉन्सर्ट वर देखील लक्ष केंद्रित होईल. नेस्को, गोरेगाव येथील घटनेतील दोषींवर नक्की कारवाई होईल.पण घटना जिथे घडली त्या मुंबई जिल्ह्यापासून प्रबोधन आणि जागृती अभियानाची सुरुवात करणे गरजेचे आहे. समाज आणि सरकार एकत्रित काम करतील तेव्हा नक्कीच यश मिळेल." असे प्रतिपादन आमदार अमित साटम यांनी यावेळी बोलताना केले.(Drugs Free Mumbai)
 
"१ मे २०२६ पासून पुढील एक वर्ष सुरू होणारे ही मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक वार्डनिहाय समन्वय साधण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. मुंबई शहरासाठीच्या या मोहिमेच्या वार्षिक उपक्रमांतर्गत मे महिन्यापासून प्रत्येक महिन्याला घोषवाक्य स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, शॉर्ट व्हिडिओ, संकल्प मुंबई शपथ अभियान , स्ट्रीट प्ले,गांधी जयंती विशेष रॅली , ड्रग्स मुक्त मुंबई (Drugs Free Mumbai) फेस्ट, इंटर कॉलेज युवा संवाद, नो ड्रग्स झोन -माय सोसायटी अभियान, निबंध स्पर्धा, मुंबई फिटनेस मॅरेथॉन, उत्कृष्टता व सन्मान सोहळा असे एकूण १२ महिन्याचे १२ कार्यक्रम आखले जाणार आहेत." अशी माहिती साटम यांनी दिली.(Drugs Free Mumbai)