Indian Railways UDID Travel : दिव्यांगजनांचा रेल्वे प्रवास सुलभ होणार

अनारक्षित दिव्यांगजन डब्यांत प्रवास करण्याची परवानगी

Total Views |
Indian Railways UDID Travel
 
नवी दिल्ली : (Indian Railways UDID Travel) दिव्यांगजनांसाठी अधिक सुलभ आणि समावेशक प्रवास सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वेने महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. वैध युनिक डिसॅबिलिटी कार्ड असलेल्या दिव्यांग व्यक्तींनाच आता मेल-एक्सप्रेस गाड्यांमधील अनारक्षित दिव्यांगजन डब्यांत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.(Indian Railways UDID Travel)
 
दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाकडून जारी केलेले वैध कार्ड असलेले तसेच भारतीय रेल्वेकडून सवलतीच्या भाड्याची सुविधा मिळणारे दिव्यांग प्रवासी, वैध प्रवास तिकीट/अधिकृतता असल्यास दिव्यांगांसाठी राखीव डब्यांत वैध प्रवासी म्हणून प्रवास करू शकतात. तसेच, दिव्यांगजन कार्ड हे दिव्यांग प्रवाशांसाठी रेल्वेकडून दिले जाणारे ओळखपत्र असून, त्याद्वारे प्रवासात सवलती मिळतात. हे कार्ड वैध अपंगत्व/सवलत प्रमाणपत्राच्या आधारे दिले जाते. काही श्रेणींमध्ये युडीआयडी कार्ड ग्राह्य धरले जाते. या कार्डसाठी अर्ज किंवा नूतनीकरण भारतीय रेल्वेच्या दिव्यांगजन पोर्टलवर किंवा केंद्र सरकारच्या सेवा पोर्टलवर करता येते.(Indian Railways UDID Travel)
 
हेही वाचा : ST Corporation : एसटीची स्थानके सौर ऊर्जा संपन्न होणार
 
याशिवाय, दिव्यांगजनांसाठी राखीव डब्यांत अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध रेल्वे कायदा, 1989 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. यामागील उद्देश म्हणजे खऱ्या लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय या सुविधा उपलब्ध करून देणे. या नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व झोनल रेल्वेंना संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.(Indian Railways UDID Travel)
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.