मुंबई : (Corporate Jihad) नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीतील कॉर्पोरेट जिहादचा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. महिलांच्या असाहाय्यतेचा फायदा घेत, त्यांच्यावर गेल्या चार वर्षांपासून लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. तसेच धर्मांतरासाठी दबावही टाकला जात होता. हा प्रकार काही नवीन नाही; गेल्या काही वर्षांत देशातील काही मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कार्यस्थळी धार्मिक बाबींशी संबंधित वाद वाढताना दिसतायत. २०१९ ते २०२६ या कालावधीत घडलेल्या विविध घटनांमुळे गंभीर प्रश्न उपस्थित झालेत.
लेंसकार्ट सारख्या एका प्रमुख रिटेल कंपनीच्या अंतर्गत ‘ग्रूमिंग पॉलिसी’ संदर्भात वाद निर्माण झाला. या धोरणात काही धार्मिक प्रतीकांवर निर्बंध असल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कंपनीच्या व्यवस्थापनाने हे दस्तऐवज जुने असल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले. मुंबईतील एका बीपीओ युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने कार्यस्थळी विशिष्ट समुदायाचे वर्चस्व वाढल्याचा आरोप करत वातावरण अस्वस्थ असल्याचे म्हटले. भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.(Corporate Jihad)
चेन्नईतील एका आयटी केंद्रात वरिष्ठ अधिकाऱ्यावर अधीनस्थ कर्मचाऱ्यांवर धर्मांतराचा दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला. काही कर्मचाऱ्यांनी व्यावसायिक परिणामांची भीती असल्यामुळे पूर्वी तक्रार केली नाही, असे सांगितले. २०२२ मध्ये एका एअरलाईनच्या काही नियमांवरून वाद निर्माण झाला. यात मंगळसूत्र, बिंदी, सिंदूर यांसारख्या पारंपरिक चिन्हांवर निर्बंध असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र तेव्हा कंपनीकडून हे नियम एकसमानतेसाठी असल्याचा दावा करण्यात आला होता.(Corporate Jihad)
२०२० दरम्यान एक प्रसिद्ध दागिन्याच्या जाहिरातीवरून प्रचंड वाद निर्माण झाला होता. या जाहिरातीत आंतरधर्मीय कुटुंब दाखवण्यात आल्याने काहींनी याला सामाजिक समावेशकतेचा संदेश म्हटले, तर काहींनी त्यावर टीका केली होती. २०१९ मध्ये होळीवर आधारित एका वॉशिंग पावडरच्या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला होता. काहींनी या जाहिरातीत सणाचे चुकीचे चित्रण केल्याचे म्हटले, तर कंपनीने विविधतेचा संदेश देण्याचा हेतू सांगितला.(Corporate Jihad)
या सर्व घटनांमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील धार्मिक अभिव्यक्ती, सांस्कृतिक संवेदनशीलता आणि कार्यस्थळी समतोल राखण्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनांकडे केवळ स्वतंत्र वाद म्हणून पाहता येणार नाही, तर त्या हिंदू समाजाच्या सांस्कृतिक ओळखीवर होणाऱ्या सूक्ष्म आघाताचे द्योतक मानल्या जात आहेत. हिंदुत्वाची संकल्पना ही अशा परिस्थितीत स्वाभिमान, परंपरा आणि अस्तित्वाच्या रक्षणासाठी उभी राहणारी शक्ती म्हणून समोर येते. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातही आपल्या संस्कृतीचा सन्मान राखण्यासाठी जागरूकता आणि ठाम भूमिका घेणे आवश्यक ठरते.
हिंदू समाजाने गाफिल राहिल्याचे हे परिणाम!
हिंदू समाजाने गाफिल राहिल्याचे हे परिणाम आहेत. जिहादी मानसिकतेचे लोक कितीही उच्च शिक्षित झाले किंवा मोठ्या पदावर गेले तरी ते षडयंत्र रचत असतात. हिंदु समाज मात्र भोळेपणाने आणि आपल्या धर्म-संस्कृती विषयी जागरूक नसल्याने त्यांच्या कट-कारस्थानांना बळी पडतात. या प्रकरणांवरुन हिंदू समाजातील पालकांनी आता आपल्या पाल्यांना जिहादी लोकांपासून सावध राहण्यासंबंधी जागृत केले पाहीजे.
यापूर्वी आपण योजनाबद्ध चालवल्या जाणाऱ्या जिहादचे आपण अनेक प्रकार पाहिले. आता कॉर्पोरेट जिहाद नावाचा नवीन प्रकार समोर आलाय. काही ठराविक आयटी कंपनीत 'मुस्लिम एचआर प्रोफेश्नल्स' प्लांट केलेले असतात. जे जास्त संख्येने पुरुष मुसलमानांना नोकरी देतात आणि त्यातून मग हिंदू मुलींना नंतर आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. एकदा अडकल्या की, नमाज अदा करायला लावणे, धर्मांतरास प्रवृत्त करणे असे प्रकार केले जातात. मध्यंतरी विविध जाहिरातींच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाल्याचेही दिसून आले. तरी कुटुंब प्रबोधन म्हणून हिंदू मुलींना जागरूक करणे ही पालकांची जबाबदारी आहे. कॉर्पोरेट जिहाद मोठे षडयंत्र असून ते मुळासकट उखडून टाकायलाच हवे.
- श्रीराज नायर, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदू परिषद
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक