मुंबई : (Vasai Fisheries Training Center) पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात अत्याधुनिक ‘मत्स्य प्रशिक्षण केंद्र’ उभारण्याबाबत मंत्रालयात सविस्तर आढावा बैठक पार पडली. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि.२० एप्रिल रोजी प्रकल्पाचा आढावा घेतला. मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देणे, मच्छिमारांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणे आणि या क्षेत्रात कौशल्यवृद्धी घडवून आणणे या उद्देशाने या केंद्राची स्थापना प्रस्तावित आहे.(Vasai Fisheries Training Center)
या बैठकीस स्थानिक आमदार स्नेहा दुबे, मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि मच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक जागेच्या उपलब्धतेसंदर्भात महसूल विभागाशी समन्वय साधून योग्य जागा निश्चित करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले.(Vasai Fisheries Training Center)
प्रस्तावित केंद्रामध्ये आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान, मत्स्य प्रक्रिया, मूल्यवर्धन, साठवणूक व्यवस्था, तसेच बाजारपेठेशी थेट जोडणी यांसंदर्भात प्रशिक्षण देण्याची योजना आहे. यामुळे स्थानिक मच्छिमारांना नव्या संधी उपलब्ध होतील, उत्पादनवाढ होईल आणि त्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे.(Vasai Fisheries Training Center)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.