मुंबई : (Nagpur NGO Harassment Case) नागपूरमधील मानकापूर परिसरात घडलेल्या एका गंभीर प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रियाज काझी याला अटक केली आहे. रियाज काझी हा गरीब व गरजू मुलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेशी (युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी) संबंधित असल्याचा आरोप असून, संस्थेतील महिला कर्मचाऱ्यांनी त्याच्याविरोधात गंभीर तक्रारी दाखल केल्या आहेत. लैंगिक छळ, मानसिक छळ, धमकी व दबाव टाकल्याचे आरोप समोर आल्याने पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे.(Nagpur NGO Harassment Case)
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चार महिलांनी पुढे येत तक्रारी नोंदवल्या आहेत. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, गेल्या सुमारे वर्षभरापासून आरोपी त्यांचा छळ करत होता. त्यांच्या इच्छेविरुद्ध काही धार्मिक कृतींमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नकार दिल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची तसेच जीवाला धोका निर्माण करण्याची धमकी दिल्याचेही महिलांनी सांगितले. काही महिलांनी नोकरी सोडण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्या कुटुंबियांनाही धमक्या देण्यात आल्याचा आरोप केला आहे.(Nagpur NGO Harassment Case)
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिच्या बहिणीबाबतही चर्चा केली होती. काही काळातच तिच्या बहिणीने नोकरी सोडली. तसेच, इतर कर्मचारीही अशाच अनुभवांमुळे संस्था सोडून गेले असल्याचे तिने सांगितले. एका २४ वर्षीय शिक्षिकेनेही अशाच प्रकारच्या अनुभवामुळे नोकरी सोडल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही प्रकरणांमध्ये गैरमुस्लिम कर्मचाऱ्यांवर इस्लामी प्रथा लादण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप आहेत.(Nagpur NGO Harassment Case)
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मानकापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक हर्ष कालसेकर यांनी शनिवारी सायंकाळी चौकशी सुरू केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याच रात्री रियाज काझीला ताब्यात घेत चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. रविवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.(Nagpur NGO Harassment Case)
पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ७४, ७५(२), ७८(२), २९६, ३०२(१), ३५६(२) अन्वये तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. संबंधित संस्थेच्या कार्यपद्धतीचा, त्यातील इतर संबंधित व्यक्तींचा आणि संभाव्य मोठ्या जाळ्याचा तपासही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, संबंधित संस्थेला बंद करण्याबाबत नोटीस देण्यात आल्याची माहिती समोर आली असून वरिष्ठ अधिकारी या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.(Nagpur NGO Harassment Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक