उबाठा ची अवस्था बुडत्याचा पाय खोलात, सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्रमास उपस्थितीने बेचैनी उघड

    02-Apr-2026
Total Views |

UBT Internal Disputes

मुंबई : (UBT Internal Disputes) उबाठा पक्ष सध्या सैरभैर झालेला आहे की काय अशी म्हणायची वेळ त्यांच्यावर आली आहे.बुडत्याचा पाय खोलात असे म्हणणे यास योग्य ठरेल.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 'ऑपरेशन टायगर 'सध्या चर्चेत आहे.त्यानुसार उबाठा चे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.आणि याला पुष्टी मिळाली ते शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावतीने दिल्लीत आयोजित स्नेहभोजनास उबाठाचे खासदार नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख उपस्थित होते.यावर स्पष्टीकरण देताना उबाठा खासदार नागेश आष्टीकर म्हणाले की, "कोणत्याही गोष्टीला एकच एंगलने बघता कामा नये.मी फक्त पाच दहा मिनिटांसाठी तिथे होतो."(UBT Internal Disputes)
 
हेही वाचा : Ashok Kharat case update: "मला काही सांगायचं..." म्हणणाऱ्या अशोक खरातला पुन्हा ७ दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?  
 
काहीच दिवसापूर्वी आदित्य ठाकरे हे मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले होते. त्यावेळी देखील जोरदार चर्चा रंगल्या होत्या. पत्रकारांनी याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,"सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमात कटुता बाजूला ठेवून सहभागी झाले पाहिजे."त्यावर पत्रकारांनी विचारले की एकनाथ शिंदे यांनी जर कार्यक्रमास बोलावले तर जाल का यावर 'त्यांनी आधी बोलवावे तरी 'असे उत्तर राऊत यांनी दिले होते.विधान भवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. विधान परिषद साठी संख्याबळानुसार महाविकास आघाडीची एक जागा विधान परिषदेत जाऊ शकते.याबाबत उद्धव ठाकरे विधान परिषदेत बिनविरोध जातील का ? असे संजय राऊत यांना गुरुवार दि.२ रोजी पत्रकारांनी विचारले असता स्वतः उद्धव ठाकरेच यावर बोलतील असे राऊत म्हणाले.एकूणच उबाठा मधील अंतर्गत समन्वय यामुळे कमी झाल्याचे दिसत आहे. एकीकडे महायुतीवर टिका आणि दुसरीकडे कार्यक्रमात भेटीगाठी असा विरोधाभास उबाठा च्या नेत्यांच्याकडून सध्या सुरु आहे. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यात देखील काही दिवसापूर्वी बेबनाव पाहायला मिळाला होता.(UBT Internal Disputes)