मुंबई : (Supreme Court On West Bengal SIR Row) गेल्या काही दिवसांपासून मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी अर्थात एसआयआरचा मुद्दा देशभरात चांगलाच चर्चेत आहे. आता पश्चिम बंगालमधील हा एसआयआरचा मुद्दा थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सर्वाधिक ध्रुवीकरण झालेले राज्य असल्याचे म्हणत न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला फटकारले. तसेच एसआयआर प्रक्रियेदरम्यान काही अधिकाऱ्यांना ओलीस ठेवल्याची ही घटना पूर्वनियोजित आणि हेतुपुरस्सर असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.(Supreme Court On West Bengal SIR Row)
सरन्यायाधीशांनी काय म्हटलं?
या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं की, "पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकजण फक्त राजकीय भाषा बोलत आहे. मी स्वतः पहाटे २ वाजेपर्यंत परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो. त्यामुळे यामागे कोण आहे हे आम्हाला माहिती आहे. पश्चिम बंगाल हे देशातील सर्वात ध्रुवीकरणाने ग्रासलेलं राज्य आहे." असे म्हणत पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर सरन्यायाधीशांनी भाष्य केले.(Supreme Court On West Bengal SIR Row)
सर्वोच्च न्यायालयाने काय आदेश दिले?
पश्चिम बंगालमधील मालदा या ठिकाणी एसआयआर प्रक्रियेदरम्यान काही अधिकाऱ्यांना ओलीस ठेवल्याच्या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेवर सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, 'तीन महिलांसह सात न्यायिक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवण्याची घटना निंदनीय आहे.' या घटनेचा तपास एनआयए किंवा सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. या बरोबरच आता एसआयआरची प्रक्रिया करणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्याचे निर्देश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.(Supreme Court On West Bengal SIR Row)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\