नवी दिल्ली : (Mangalprabhat Lodha) राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून तब्बल १७ पदकांची कमाई केली आहे. यात चार सुवर्ण पदकांची समावेश आहे. देशपातळीवर मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.(Mangalprabhat Lodha)
केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ पार पडला. येत्या सप्टेंबर महिन्यात चीनमधील शांघाय येथे जागतिक कौशल्य स्पर्धा होणार असून यात भारतीय चमूदेखील सहभागी होणार आहे.(Mangalprabhat Lodha)
राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेच्या या सांगता समारंभाला राजस्थानचे कौशल्य विकास मंत्री राज्यवर्धन जी राठोड, बिहारचे मंत्री संजय सिंग टायगर, हरियाणाचे मंत्री गौरव गौतम, उत्तर प्रदेशचे युवक कल्याण आणि कौशल्य विकास मंत्री कपिलदेव अग्रवाल उपस्थित होते.(Mangalprabhat Lodha)
मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) म्हणाले की, "कौशल्य प्रशिक्षण हे केवळ रोजगारासाठी नसून राष्ट्रनिर्माणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. यात कौशल्यधारित प्रशिक्षण महत्वाचे योगदान देणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी 'पीएम सेतू' योजना सुरू करून देशभरातील कौशल्य विकासाची गती वाढवली आहे. याच धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विकासाचे अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबवले जात असून आज मिळालेली पदके त्याचेच द्योतक आहे."(Mangalprabhat Lodha)
राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राने ४ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कांस्य अशी एकूण १७ पदके जिंकून उल्लेखनीय यश मिळवले आहे. ही उल्लेखनीय कामगिरी उत्कृष्टता आणि समर्पणाचे प्रतीक असून सर्व पदक विजेत्यांना आता नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून प्रगत प्रशिक्षण दिले जाईल, आणि सर्वोत्तम कामगिरी करणारे स्पर्धक शांघाय येथे होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.(Mangalprabhat Lodha)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....