मुंबई : (Artemis 2) अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने 'आर्टेमिस-२' (Artemis II) या चंद्राभोवतीच्या पहिल्या मानवी मोहिमेला यशस्वी सुरुवात केली आहे. गुरुवारी पहाटे अमेरिकेतील फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून नासाचे चार अंतराळवीर चंद्र मोहिमेसाठी झेपावले आहेत. अपोलो मोहिमेनंतर ५० वर्ष कोणत्याही मानवाने पृथ्वीपासून इतका मोठा प्रवास केला नव्हता.(Artemis 2)
प्रक्षेपित झालेल्या नासाच्या 'आर्टेमिस २' मिशनद्वारे अमेरिकेचे अंतराळवीर रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर आणि क्रिस्टीना कोच, तसेच कॅनडाचे जेरेमी हॅन्सेन हे चंद्राची प्रदक्षिणा घालतील. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जवळपास एक वर्ष घालवलेल्या ४७ वर्षीय कोच या चंद्राच्या परिसरात पोहोचणाऱ्या पहिल्याच महिला अंतराळवीर ठरणार आहेत. हे अंतराळवीर एका मिनीबसच्या आकाराच्या कॅप्सूलमधून प्रवास करणार आहेत.(Artemis 2)
आर्टेमिस-२ मोहिमेसाठी नासा एसएलएस रॉकेटचा (SLS Rocket) म्हणजेच स्पेस लाँच सिस्टिम रॉकेटचा वापर करत आहे. नासाकडे सध्या असलेले हे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. दरम्यान, अपोलो मिशनसाठी 'सॅटर्न व्ही रॉकेट'चा वापर करण्यात आला होता. ते देखील शक्तिशाली रॉकेट म्हणून ओळखले जाते.(Artemis 2)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\