मुंबई : (Mumbai–Ahmedabad Bullet Train Project) भारतातील पहिला मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आता वेगाने पूर्णत्वाकडे जातो आहे. या प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक घटक मानला जाणारा महाराष्ट्रातील 'बीकेसी ते शिलफाटा' दरम्यानचा २१ किलोमीटर लांबीचा भूमिगत बोगदा वेगाने अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि काटेकोर नियोजनाचा संगम या कामात स्पष्टपणे दिसून येतो.(Mumbai–Ahmedabad Bullet Train Project)
एनएचआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार, या बोगद्याच्या ५ किलोमीटर भागाचे खोदकाम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. २१ किलोमीटरचा बोगदा बीकेसी (मुंबई) आणि शिलफाटा यांच्यामध्ये आहे, त्यातील ५ किलोमीटरचा भाग घनसोली आणि शिलफाटा दरम्यान आहे. खोदकामानंतर आता बोगद्याच्या सुरक्षितता आणि टिकाऊपणावर भर देणाऱ्या प्रक्रिया वेगाने सुरू आहेत. झिरपणाऱ्या पाण्याचे अचूक व्यवस्थापन करण्यासाठी आधुनिक ड्रेनेज सिस्टीम उभारली जात आहे, तर वॉटरप्रूफिंग मेम्ब्रेन द्वारे बोगद्याला जलरोधक कवच दिले जात आहे. (Mumbai–Ahmedabad Bullet Train Project)
बोगद्याच्या आतील भागात स्टील रिइंफोर्समेंट केजेस बसवून संरचनेला मजबुती दिली जात. याशिवाय, भविष्यातील ऑपरेशन आणि देखभालीसाठी आवश्यक उपकरण कक्षांची उभारणीही सुरू आहे. प्रत्येक टप्पा अचूकतेने आणि वेळेच्या चौकटीत पूर्ण होत असल्याने हा बोगदा आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर उभा आहे.(Mumbai–Ahmedabad Bullet Train Project)
दरम्यान, संपूर्ण ५०८ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पातही उल्लेखनीय प्रगती झाली आहे. ५०८ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर ३४३ किलोमीटर व्हायाडक्ट आणि ४३४ किलोमीटर पिअर वर्क पूर्ण झाले आहे. याशिवाय १७ नदी पूल, ५ प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट पूल आणि १३ स्टील पूल बांधून पूर्ण झाले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि आवाज नियंत्रणासाठी २८० किलोमीटर पट्ट्यात ५.६ लाखांहून अधिक नॉईज बॅरिअर्स बसवण्यात आले आहेत.(Mumbai–Ahmedabad Bullet Train Project)
रेल्वे ट्रॅकच्या दृष्टीने ३६० ट्रॅक किलोमीटर, म्हणजेच १८० रूट किलोमीटर आरसी ट्रॅक बेड तयार करण्यात आला असून, १५९ रूट किलोमीटर अंतरावर ६९०० हून अधिक ओव्हरहेड इक्विपमेंट उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सात पर्वतीय बोगद्यांपैकी दोन बोगद्यांचे ब्रेकथ्रू यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.(Mumbai–Ahmedabad Bullet Train Project)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.