मुंबई : (Agricultural Damage in Maharashtra) अवकाळी पावसामुळे राज्यात १ लाख २२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्यभरातील नुकसानीची माहिती घेऊन तातडीने पंचनामे पूर्ण करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.(Agricultural Damage in Maharashtra)
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. त्यांनी भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे भेट देऊन गावातील नुकसान झालेल्या आंब्याच्या बागांचे तसेच विविध शेती पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. अनेक ठिकाणी फळगळ, झाडांचे नुकसान तसेच उभ्या पिकांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यभर मोठे नुकसान झाले आहे.(Agricultural Damage in Maharashtra)
राज्यात केळी, गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, कलिंगड, भाजीपाला, डाळिंब, कांदा, संत्रा, द्राक्ष आदी पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणी कांदा कुजला असून पपईची रोपेही खराब झाली आहेत. शेतात पाणी साचल्याने उभी पिके आडवी झाली असून मजुरी आणि खतांचा खर्च वाया गेला आहे.(Agricultural Damage in Maharashtra)
शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये
मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये," अशी विनंती त्यांनी केली.(Agricultural Damage in Maharashtra)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....