Bharatmata Cinema : मराठी माणसाच्या असंख्य आठवणींचे गाठोडे म्हणजे भारतमाता
सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड आशिष शेलार
02-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Bharatmata Cinema) "लालबाग, परळ आणि गिरणगावातील असंख्य मराठी माणसाच्या आठवणींचे एक मोठे गाठोडे घेऊन भारतमाता सिनेमागृह उभे आहे. सरकार म्हणून त्याचे आम्ही जतन करण्याचे पुर्ण प्रयत्न करीत आहोत, आपण सगळ्यांचे पाठबळ असू द्या." असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड आशिष शेलार यांनी गुरुवार दि.२ रोजी केले.(Bharatmata Cinema)
मराठी सिनेमाचे माहेर घर अशी ओळख असलेल्या लालबागच्या नाक्यावरील भारतमाता सिनेमागृहाचा डागडुजीनंतर पुन्हा राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पडदा उघडला. झी टाँकीज निर्मित " सुपर डूपर" सिनेमाच्या शुभारंभाचा प्रयोगाच्या निमित्ताने हा उद्घाटन सोहळा पार पडला. दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सह व्यवस्थापक प्रशांत साजणीकर,अभिनेत्री निर्मिती सावंत, ऋषिकेश जोशी, लेखक समीर पाटील, निर्माते विजय शिंदे यांच्या सह सुपर डूपरचे कलाकार यावेळी उपस्थितीत होते.(Bharatmata Cinema)
यावेळी मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "माझे आजोळ लालबाग असल्याने मी आई सोबत या सिनेमागृहात सिनेमा पाहिला त्याच्या आठवणी आज ताज्या झाल्या. आज माझ्या सारख्या असंख्य मराठी माणसाच्या आठवणी या सिनेमागृहाशी जोडलेल्या आहेत. हा नका सुध्दा चळवळी आणि आंदोलनाचे केंद्र होते. या भारतमाता मध्ये उभा असताना मोठा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आहे. आज एक पडदा सिनेमागृह चालवणे आव्हान आहे अशावेळी आम्ही सरकार म्हणून उभे आहोतच पण मराठी प्रेक्षकांनी सुध्दा या सिनेमागृहाच्या पाठीशी उभे रहायला हवे. रंगमंचाच्या जागेचे नियोजन जमले तर सरकारचा चित्रपट पुरस्कार सोहळा सुध्दा आम्ही याच सिनेमागृहात घेऊ."(Bharatmata Cinema)
या ऐतिहासिक सिनेमागृहाचे पुनरुज्जीवन वन सिनेमाज यांनी केले असून, मुक्ता ए टू सिनेमाज यांच्या सहकार्याने सिंगल स्क्रीन सिनेमाचा अनुभव पुन्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.(Bharatmata Cinema)
नवीन भारतमाता सिनेमा आता डॉल्बी सराउंड साउंड, टू के लेझर प्रोजेक्शन, लक्झरी रीक्लायनर्स आणि सोफा सीटिंग तसेच सुधारित खाद्यपदार्थ सुविधा अशा आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना अधिक मोठा आणि उत्कृष्ट सिनेमाचा अनुभव मिळेल. तांत्रिक सुधारणा करताना सिनेमाचा वारसा आणि त्याची ओळख कायम ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.(Bharatmata Cinema)