Satara District Cooperative Board : सातारा जिल्हा सहकारी बोर्डाच्या अद्यावत सहकार प्रशिक्षण सभागृहाचे
मंत्री शिवेंद्रराजे भोसले व आ. प्रविण दरेकरांच्या हस्ते उदघाटन
19-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Satara District Cooperative Board) महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या धोरणा अंतर्गत सातारा जिल्हा सहकारी बोर्ड, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हा सहकारी बोर्डाच्या अद्यावत सहकार प्रशिक्षण सभागृहाचे उदघाटन उद्या सोमवार, २० एप्रिल, २०२६ रोजी सकाळी १० वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार नितीन जाधव (पाटील) असतील.
सातारा जिल्हा सहकारी बोर्ड (Satara District Cooperative Board), सहकार मंदिर, अजिंक्य कॉलनी, कॅम्प सातारा येथे पार पडणाऱ्या या उदघाटन सोहळ्याला कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष व माजी खासदार संजय मंडलिक यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष (दिल्ली) संजीव कुसाळकर, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष अर्जुनराव बोबडे, मानद सचिव रामदास मोरे, तज्ज्ञ संचालक शिवाजीराव नलावडे, सातारा जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली रावल-ठाकूर, सातारा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, सातारा जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्रीधर कोल्हापुरे, सातारा जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे आणि सातारा जिल्हा सहकारी संस्थांचे सर्व उप-सहाय्यक निबंधक उपस्थित राहणार आहेत.
तसेच सहकार मंत्रालय सहसचिव (सेवानिवृत्त) एस. बी. पाटील व प्राथमिक शेती संस्था विकास कक्षाचे समन्वयक रमेश बांडे यांची प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक व निमंत्रक धनंजय शेडगे यांनी दिली.(Satara District Cooperative Board)