Power Generation and Supply : वीजनिर्मिती आणि पुरवठा सुरळीत राहण्यासाठी 'एआय'चा वापर करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; "पीक डिमांड" संदर्भात वीज वितरण आढावा बैठक संपन्न

    19-Apr-2026   
Total Views |
devendra fadanvis speaks about ai
 
मुंबई :(Power Generation and Supply) वीजनिर्मिती व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी 'एआय'चा वापर करून यासंदर्भातील व्यवस्थापन करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
 
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उन्हाळ्याच्या काळातील 'पीक डिमांड' संदर्भात झालेल्या वीज वितरण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ श्रीकर परदेशी, टाटा पॉवर, अदाणी पॉवरचे व 'बेस्ट'चे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उन्हाळा व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी वीजनिर्मिती व पुरवठा (Power Generation and Supply)सुरळीत राहण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात. यासाठीच्या व्यवस्थापनासाठी तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी 'एआय'चा वापर करावा."
 
 
रुफटॉप सौर ऊर्जेमुळे फायदा होत आहे. वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा व पाण्याची उपलब्धताही आहे. वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत रहावा यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मॉन्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामेही करण्यात येत आहेत. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती यावेळी ऊर्जा विभागामार्फत देण्यात आली‌.(Power Generation and Supply)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....