narendra modi : नरेंद्र मोदी हे राष्ट्राचे आधारस्तंभ , जनतेने तीन वेळा त्यांना पंतप्रधान केलं - नवनाथ बन

    19-Apr-2026
Total Views |
navnath ban speaks about narendra modi
 
मुंबई :(narendra modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर देताना रविवार दि.१९ रोजी नवनाथ बन म्हणाले की, "जनतेनेच राऊतांना राजकीयदृष्ट्या पांगळ केल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजार नसून राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर गेला आहे. तीन वेळा जनतेने त्यांना पंतप्रधानपदी निवडून दिलं, हेच त्यांच्या कार्याचं मोठं प्रमाण आहे."
 
"जनतेनेच राऊतांचा झेल घेऊन त्यांची विकेट काढली आहे. विधानसभा, महापालिका आणि इतर निवडणुकांत पराभव झाल्याने कोण फेल आहे हे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा विश्वास दाखवला आहे." असेही बन यांनी स्पष्ट केले.
 
"पंतप्रधानांच्या (narendra modi) भाषणात काँग्रेसचा उल्लेख मोजण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची दयनीय अवस्था पाहावी.देशभरात काँग्रेसला जनतेने नाकारले आहे. लोकसंख्येनुसार खासदारांची संख्या वाढवणे आवश्यक असताना दक्षिणेकडील राज्यांच्या वाढीला विरोध का केला, याचे उत्तर राऊतांनी द्यावे." असेही बन म्हटले.
 
 
महिला आरक्षण विधेयकावरून संजय राऊतांवर टीका करताना बन म्हणाले की," मोदी सरकारने महिलांना सन्मान देण्यासाठी विधेयक आणले, मात्र त्याला विरोध करून नारी शक्तीचा अपमान करण्यात आला. २०२३ मध्ये मान्यता मिळालेल्या या विधेयकाच्या अंमलबजावणीस अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला, याचा हिशेब जनता नक्कीच घेईल."(narendra modi)
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने कठोर कारवाई करत एकाही दहशतवाद्याला सोडले नाही, असेही बन यांनी स्पष्ट केले.
 
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांवर टीका करताना बन म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर गेलेल्या लोकांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. राज्यात धर्मांतराच्या घटनांवर ठाकरे गट गप्प असून त्यांनी मतांसाठी तडजोड केली आहे."
 
भाजप कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून अफजलखानाच्या विचारांना विरोध करतो. देशासाठी योगदान देणाऱ्या मुस्लिमांचा आम्हाला अभिमान आहे, मात्र राऊत जाणीवपूर्वक चुकीचा प्रचार करत असल्याचा आरोप बन यांनी केला.(narendra modi)
 
"विधान परिषदेच्या जागेसाठी ठाकरे गटाला काँग्रेससमोर झुकावे लागत असून एकेकाळचा स्वाभिमानी पक्ष आज सत्तेसाठी तडजोड करत असून ,त्यांनी जनतेच्या विरोधात भूमिका घेतल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील."असे बन यांनी सांगितले.(narendra modi)