मुंबई : (Devendra Fadnavis) भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणातील पीडितांना संपूर्ण विश्वास द्या. या प्रकरणात कुणीही दोषी असला तरी, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. न्यायालयात हे प्रकरण टिकवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा. अपराधसिद्धी हा तपासात महत्वाचा घटक असला पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) शनिवारी गृह विभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. यावेळी नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरात प्रकरण, आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण, परतवाडा आणि गोरेगाव ड्रग्ज प्रकरणांच्या तपासाची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. यावेळी पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.(Devendra Fadnavis)
राज्यात धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका. नाशिक पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणले, त्यांचे अभिनंदन. पण, आता तितकाच दमदार तपास झाला पाहिजे. या प्रकरणात असणाऱ्या सर्व पॅटर्नचा तपास करा. कोणताही अँगल तपासातून सुटू नये. यासोबतच गोरेगाव ड्रग्ज प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, ड्रग्जविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया करा. तरुणाईच्या भविष्याशी निगडित ही बाब असून अशी प्रकरणे गांभीर्याने घ्या. तसेच परतवाडा प्रकरणात पीडितांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वास द्यावा. यासाठी संबधित समाजसेवकांची मदत घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिल्या.(Devendra Fadnavis)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....