Narishakti Vandan महिलांचा सन्मान करण्याची संधी विरोधकांनी गमावली - एकनाथ शिंदे
महायुतीच्या नेत्यांची विरोधकांवर सडकून टीका
19-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Narishakti Vandan) "नारीशक्ती वंदन विधेयक जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणले होते त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. महिलांचा सन्मान करण्याची,त्यांना आत्मनिर्भर करण्याची संधी विरोधी पक्षांना या विधेयकाच्या निमित्ताने चालून आली होती. पण त्यांनी ती संधी गमावली आहे. त्यामुळे हा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. काँग्रेससह त्यांच्या मित्र पक्षांचा महिलाविरोधी खरा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे मी त्यांचा धिक्कार करतो. महिलांच्या अधिकारांना काढून घेण्याचे आणि लोकशाहीची हत्या करण्याचे काम विरोधकांनी केलं आहे. जसे महाराष्ट्रात लाडक्या बहिणीनी विरोधी पक्षांना धडा शिकवला, तसेच देशातील महिला त्यांचे लाडके भाऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देतील आणि देशातील विरोधी पक्षांना धडा शिकवतील." असे रोखठोक प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार दि.१९ रोजी केले.
"काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचा नारी शक्तीशी द्रोह आहे. असे कृत्ये ज्यांनी केले ज्यांनी आया बहिणींच्या अधिकारांवर वरवंटा फिरवला.त्यांना जनतेने दिलेली शिक्षा येणाऱ्या काळात पाहायला मिळेल.काँग्रेसने हे पाप केल आहे. काँग्रेसला या पापाची शिक्षा भोगावी लागेल.भाजप आणि एनडीए माता- भगिनींच्या अधिकारांसाठी शेवटपर्यंत लढत राहणार. काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भीती आहे का." असे मत सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड आशिष शेलार यांनी रविवार दि.१९ रोजी व्यक्त केले.(Narishakti Vandan)
" मातृशक्तीला सन्मान देण्याचे नारीशक्ती वंदन (Narishakti Vandan)बिल होते.पण नतद्रष्ट काँग्रेससह त्यांच्या मित्रपक्षांनी याला विरोध केला.मुंबईची महापौर म्हणून मी काँग्रेसचा निषेध करते.सभागृहात मी काळी साडी नेसून याचा निषेध करणार आहे. महिलांना आदर न देणारा काँग्रेस पक्ष आहे. समस्त नारीशक्ती काँग्रेसला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.भाजपमध्ये महिलांना सन्मान आहे.म्हणून हा देशातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात महिलांना दिलेला अधिकार देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत होते." अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिली.(Narishakti Vandan)