जलबोगदा क्रमांक १ व जलबोगदा क्रमांक २ यांचे भरण व क्लोरीनीकरणाचे काम हाती
18-Apr-2026
Total Views |
मुंबई: (Water Tunnel) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठ्याकामी अमर महल (हेगडेवार उद्यान) ते वडाळा (प्रतीक्षा नगर) आणि पुढे परळ (सदाकांत धवन उद्यान) जलबोगदा १ (एएमटी-१) कार्यान्वित आहे. तसेच, अमर महल (हेगडेवार उद्यान) ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय आणि पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशय जलबोगदा २ (एएमटी-२) हादेखील अविरत कार्यरत आहे. जलबोगद्याद्वारे (Water Tunnel)होणा-या पाणीपुरवठ्याचे भरण (चार्जिंग), धुलाई (फ्लशिंग), क्लोरीनीकरण व डी-क्लोरीनीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहे. ही सर्व कामे सोमवार, दिनांक २० एप्रिल ते सोमवार, दिनांक २७ एप्रिल या कालावधीत केली जाणार आहेत.
परिणामी, मुंबई पूर्व उपनगरातील एल (कुर्ला पूर्व), एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस, टी आणि मुंबई शहरातील ए, बी, सी, ई, एफ उत्तर आणि एफ दक्षिण या विभागात पाणीपुरवठ्यात ५ टक्के कपात लागू राहणार आहे. याची संबंधित विभागातील नागरिकांना नोंद घ्यावी असे नम्र आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.(Water Tunnel)