Review of the Progress of the Vadhavan Port Project
Wadhwan Port Project : व्हीपीपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडून
Wadhwan Port Project : पुढील वाटचालीवर उच्चस्तरीय बैठक
मुंबई : (Wadhwan Port Project)वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (व्हीपीपीएल)चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौरव दयाल यांनी महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील वाटचालीचा आराखडा निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित केली.
या बैठकीत प्रकल्पाचा पुढील टप्पा, रस्ते जोडणीसाठी आवश्यक जमीन संपादन, मत्स्य व्यवसायाशी संबंधित धोरणात्मक बाबी तसेच स्थानिक मनुष्यबळाच्या कौशल्यविकासासाठी राबवण्यात येत असलेल्या वाढवण पोर्ट कौशल्य विकास कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, मत्स्य आयुक्त, मुंबई प्रेरणा देशभरतर, जेएनपीएचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, व्हीपीपीएल रविश कुमार सिंह हेही या बैठकीस उपस्थित होते व त्यांनी चर्चेत सक्रिय सहभाग नोंदविला. यासह बैठकीस केंद्र व राज्य शासनातील विविध महत्त्वाच्या विभागांतील आणि संस्थांतील इतर वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये बंदर प्रशासन, जिल्हा प्रशासन, कायदा अंमलबजावणी यंत्रणा, वन व मत्स्य विभाग यांचे अधिकारी तसेच एनएचएआय, डीएफसीसीआयएल, भारतीय रेल्वे, तांत्रिक सल्लागार आणि इतर कौशल्य विकास संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
महत्त्वाच्या रस्ते पायाभूत सुविधांसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया गतिमान करण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली, जेणेकरून बंदराशी अखंड आणि सुरळीत जोडणी सुनिश्चित करता येईल. तसेच, मत्स्य व्यवसायाशी संबंधित प्रश्न हाताळताना संतुलित दृष्टिकोन अवलंबण्याचे महत्त्व अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी अधोरेखित केले, ज्यायोगे प्रकल्पाच्या उद्दिष्टांसोबतच स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेचे संरक्षणही सुनिश्चित होईल.(Wadhwan Port Project)
वाढवण पोर्ट कौशल्य विकास कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचा उद्देश स्थानिक युवकांना उद्योग-सुसंगत कौशल्ये प्रदान करणे तसेच प्रकल्पाच्या प्रगतीसोबतच परिसरातील रोजगाराच्या संधी वाढवणे हा आहे. जेएनपीएचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी विविध संस्थांमधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करत सर्व संबंधित भागधारकांना मुद्द्यांचे निराकरण करण्यासाठी आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा वेग कायम राखण्यासाठी परस्पर सहकार्याने काम करण्याच्या सूचना दिल्या.(Wadhwan Port Project)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....