नाशिकमधील घटना हा एका मॉड्युलचा भाग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गरज पडल्यास केंद्रीय तपास यंत्रणांनांची मदत घेणार

    18-Apr-2026   
Total Views |
devendra fadanvis speaks about corporate jihad
 
कोलकाता :(Corporate Jihad)नाशिकमधील घटना हा एका मॉड्युलचा भाग असून यात आम्ही कडक कारवाई करत आहोत. गरज पडल्यास या घटनेच्या तपासासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनांची मदत घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. त्यांनी कोलकाता येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत घडलेल्या कार्पोरेट जिहाद(Corporate Jihad) प्रकरणी सध्या राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नाशिकमधील घटना गंभीर असून यात आम्ही कडक कारवाई करत आहोत. हा प्रकार एका मॉड्युलचा भाग आहे. सुदैवाने, टीसीएस कंपनीने यात कडक भूमिका घेतली आहे. कुणालाही पाठीशी न घालण्याची टीसीएसची भूमिका आहे. तसेच टीसीएसच्या प्रमुखांनीही या घटनेचा निषेध केला. या मॉड्युलचे धागेदोरे कुठपर्यंत आहे, याचा तपास आम्ही करू. आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांनाही या प्रकरणाची माहिती दिली असून आवश्यकतेप्रमाणे त्यांचीही मदत यात घेतली जाईल."
 
हेही वाचा : TCS Nashik Case : TCS नाशिक प्रकरणाला नवे वळण : फरार निदा खान अटकपूर्व जामिनाच्या तयारीत, गर्भवती असल्याचा दावा शक्य...
 
घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार
 
"देशात जिथे जिथे लोकसांख्यिकीय बदल झाले ते घुसखोरांनी केलेत. या घुसखोरांना आपला देश, राज्य किंवा समाजाप्रति प्रेम नसून ते जगण्यासाठी इथे आले आहेत. आपल्या जगण्यासाठी ते वैध आणि अवैध हातखंडे वापरत आहेत. अनेकवेळा देशात झालेले हल्ले आणि बॉम्बस्फोटात मदत करणारे परदेशी घुसखोरच होते. मुळात आमचा कोणत्याही भारतीयाला विरोध नाही. परंतू, घुसखोरांना शोधून आम्ही त्यांना देशाबाहेर काढू," असा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.(Corporate Jihad)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....