देशविघातक काँग्रेसी विचारधारा असलेल्यांना देशभक्तीचे लॉजिक कळणार नाही - रविंद्र चव्हाण

    18-Apr-2026
Total Views |
ravindra chavan vs rahul gandhi
 
मुंबई :(Ravindra Chavan) "ज्यांच्या मनात केवळ देशविघातक काँग्रेसी विचारधारा आहे, त्यांना देशभक्तांच्या शौर्याचे 'लॉजिक' कधीच समजणार नाही!
 
'मोहोब्बत की दुकान'चे प्रोपरायटर राहुल गांधी यांची दहशतवाद्यांबद्दलची 'मोहोब्बत' आज पुन्हा एकदा संसदेत उफाळून आली, त्यामुळेच 'बालाकोट एअर स्ट्राईक' आणि 'ऑपरेशन सिंदूर' हे 'मॅजिक' असल्याची गरळ त्यांनी ओकली.
 
अर्थात, काँग्रेसने सत्तेत असताना दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले आणि फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी करण्यातच धन्यता मानली. त्यामुळेच मोदीजींच्या नेतृत्वातील नवा भारत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देतो, ही बाब 'शहजाद्यां'ना पचनी पडत नाही हे उघड आहे. मात्र स्वतःचे 'पॉलिटिकल लाँचिंग' वारंवार फेल झालेल्या 'शहजाद्यां'नी भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात उभं राहून लष्करी मोहिमांना आणि जवानांच्या शौर्याला 'विदूषकी उपमा' देणे, हा केवळ बालिशपणा नसून भारतीय लष्कराच्या शौर्य व बलिदानाचा घोर अपमान आणि काँग्रेसच्या देशद्रोही मानसिकतेचे दर्शन आहे.राहुल गांधी हे असले 'फेक नरेटिव्ह' पसरवून नक्की कोणाला खुश करत आहेत? त्यांचे हे विधान थेट पाकिस्तानच्या 'फेक नरेटिव्ह'ला खतपाणी घालणारे आहे. भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचा उपहास करणाऱ्या या 'शहजाद्याला' देश कधीही माफ करणार नाही !" असे खडेबोल भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्या एक्स हँडलवरून राहुल गांधी यांना सुनावले आहेत.(Ravindra Chavan)