मुंबईच्या श्रेया मुंदडा हिने पटकाविले भारतासाठी पहिले सुवर्णपदक तर वैशाली रमेशबाबूने जिंकले वुमेन्स कँडिडेट्स चेस टूर्नामेंट'

Olympiad

    18-Apr-2026
Total Views |

olympiad competition (1)
 
मुंबई :(Olympiad) फ्रान्समधील बोर्डो येथे पार पडलेल्या १५ व्या ' युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड '(Olympiad) स्पर्धेत भारतीय संघाने ऐतिहासिक यश संपादन करत देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. या स्पर्धेत मुंबईच्या श्रेया मुंदडा हिने भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच भारतीय संघाने एकूण १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्यपदक पटकावून या स्पर्धेच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवत ६७ सहभागी देशांमध्ये सहाव्या क्रमांकाचे स्थान मिळविले.
 
तर महिला बुद्धिबळपटू वैशाली रमेशबाबू हिने २०२६ च्या प्रतिष्ठित 'वुमेन्स कँडिडेट्स चेस टूर्नामेंट'मध्ये ऐतिहासिक विजय मिळवत संपूर्ण देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेमध्ये विजय मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. या विजयासोबतच वैशाली रमेशबाबूने या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या 'वर्ल्ड चॅम्पियनशिप'मधील आपलं स्थान पक्कं केलं आहे. (Olympiad)
 
हेही वाचा : Aviation Crisis: विमान कंपन्यांना 4000 कोटींच्या कर्जसहाय्याची तयारी
 
"श्रेयाची ही ऐतिहासिक कामगिरी कौतुकास्पद असून गणित क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उंचावण्यासाठी राज्यातील युवा वर्गाला प्रेरणा देणारी ठरेल.श्रेयासह संपूर्ण भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! तर या उत्तुंग यशासाठी वैशालीचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! तुझा देशाला अभिमान आहे. " अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्या एक्स हँडलवरून व्यक्त केली आहे
"आपल्या देशाच्या लेकींनी केलेल्या या यशाचा संपूर्ण देशाला सार्थ अभिमान आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय संघ आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन.भारतीय संघाची ही कामगिरी गणित क्षेत्रातील अनेक तरुण विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ठरेल." अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या एक्स हँडलवरून व्यक्त केली आहे.(Olympiad)