मुंबई : (MMRDA Pen Growth Deal) 'एमएमआरडीए' आणि रायगड-पेण ग्रोथ सेंटर यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी सह्याद्री अतिथीगृह येथे भागधारक करार झाला.(MMRDA Pen Growth Deal)
यावेळी महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी अन्बळगन, व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक व धोरण विषयक सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच ऑरेंज सिटी ग्रुपचे निखिल गांधी उपस्थित होते.(MMRDA Pen Growth Deal)
या कराराअंतर्गत रायगड पेण ग्रोथ सेंटर लि., एकीकृत टाऊनशिप निती प्रस्तावित, स्मार्ट सिटी म्हणून विकसित होणार, रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात विस्तार, प्रमुख बंदर क्षेत्राशी जोडलेले आत्मनिर्भर टाऊनशिप, सामाजिक निवास राखीव इत्यादी बाबी विकसित होणार आहेत.(MMRDA Pen Growth Deal)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....