मुंबई :(Mangal Prabhat Lodha)अधिकाधिक नागरिकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हेच ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या समाधान शिबिराकडे ‘जनता दरबार’ म्हणून पाहत प्रत्येक नागरिकाच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करावे, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानांतर्गत गावदेवी येथील शारदा मंदिर हायस्कूल येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.(Mangal Prabhat Lodha)
मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी यावेळी शासकीय कार्यालयांमध्ये प्राप्त होणारे अर्ज आणि निवेदने वेळेत निकाली काढण्याचे निर्देश दिले. तसेच शासनाने प्रत्येक कामासाठी निश्चित कालमर्यादा दिली असून कोणतीही प्रकरणे प्रलंबित राहू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराजस्व समाधान शिबीर (टप्पा-१) अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन समस्यांचे तातडीने निराकरण करणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नव्या तरतुदींची जनजागृती करणे, त्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे, डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर वाढविणे तसेच ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने मार्च ते मे या कालावधीत मुंबई शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.(Mangal Prabhat Lodha)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....