Hindutva : बोरीवलीत सकल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; ७५० हून अधिक उपस्थिती

    18-Apr-2026   
Total Views |
hindu sammelan
 
मुंबई : (Hindutva) बोरीवली परिसरातील लोकमान्य टिळक नगर येथील परांजपे नगर वस्तीत ‘सकल हिंदू संमेलन’ मोठ्या उत्साहात पार पडले. ज्ञानयोग सहनिवास येथे आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनास सुमारे ७५० हून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावली. संमेलनाची सुरुवात शंखनादाने झाली. त्यानंतर ज्ञानयोग सहनिवासातील महिला शक्तींनी रामरक्षा स्तोत्राचे सादरीकरण केले. कुमारी स्वरा अनिल खरे हिने ‘जयोस्तुते’ हे गीत सादर केले, तर तुषार वैद्य यांनी संघरचनेतील एकल गीत सादर केले.
 
या संमेलनाचा मुख्य विषय ‘पंच परिवर्तन’ हा होता. बोरीवली भागाचे पर्यावरण संयोजक पराग जनार्दन कुलकर्णी यांनी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ‘पंच परिवर्तन’ का आवश्यक आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्ण समय पुरोहित सीताराम फडके होते. प्रमुख अतिथी म्हणून ‘टेस्ट ऑफ कोकण’ उपहारगृहाच्या सर्वेसर्वा श्रीमती शीतल कुबल उपस्थित होत्या. तसेच गिरगाव कट्ट्याचे प्रदीपजी मालणकर आणि बोरीवली विचार मंचचे निखिल दाते यांचीही विशेष उपस्थिती लाभली.(Hindutva)
 
हेही वाचा :  Dr. Mohanji Bhagwat : सेवाकार्यात समाजानेही सक्रिय सहभाग घ्यावा : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
 
संमेलनाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ अभिनेते शरद माधव पोंक्षे यांनी हिंदू समाजात सकारात्मक परिवर्तनाची गरज अधोरेखित केली. तसेच संघाच्या माध्यमातून हिंदुत्व (Hindutva)जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी होत असलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली. ‘स्वबोध’ या संकल्पनेवर त्यांनी विशेष भर दिला. कार्यक्रमाच्या शेवटी विनय जोगळेकर यांनी सादर केलेल्या संपूर्ण ‘वंदे मातरम्’ने संमेलनाचा समारोप झाला. यावेळी राष्ट्रभक्तीपर पुस्तकांचे वितरणही करण्यात आले. एकूणच, या संमेलनातून समाजात जागरूकता आणि सकारात्मक परिवर्तनाचा संदेश देण्यात आला.(Hindutva)
  

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक