मुंबई : (Legislative Council Election) राज्यातील विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून सर्वच पक्षांकडून निवडणूकीची तयारी सुरु झाली आहे. या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येणार असल्याने तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
येत्या १२ मे रोजी विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. तसेच विधानपरिषद सदस्या असलेल्या प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवरही पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, या ९ जागांपैकी महायुतीच्या वाट्याला ८ तर, महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार आहे. या एका जागेसाठी मविआत वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.(Legislative Council Election)
काँग्रेसचे म्हणणे काय?
उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधानपरिषदेवर जाणार का, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. अशातच "उद्धव ठाकरे उमेदवार असतील तरच काँग्रेस सहानुभूतीपूर्वक विचार करणार. पण वेगळे काही प्रस्ताव असल्यास चर्चेची आवश्यकता आहे," असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. शिवाय प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेली १० वी जागा काँग्रेसची असल्याचा दावाही त्यांनी केला.
शिवाय, उबाठा गटातर्फे अंबादास दानवे, सुषमा अंधारे, राजन विचारे आणि सूरज चव्हाण यांचीही नावे चर्चेत आहेत. यात सूरज चव्हाण यांच्यासाठी आदित्य ठाकरे आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे समजा, उद्धव ठाकरेंनी स्वत: ही निवडणूक लढवली नाही तर, काँग्रेस स्वतंत्र उमेदवार देणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या सगळ्यात शरद पवार गट कुणाला पाठींबा देणार? याबाबतही उत्सुकता कायम आहे.(Legislative Council Election)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....