कोल्हापूर : (Amol Nayaku Gavane) कधी कधी शासनव्यवस्थेला संवेदनशीलतेचा स्पर्श झाला की एका सामान्य माणसाच्या आयुष्यात आशेचा दिवा प्रज्वलित होतो. याचाच प्रत्यय कोल्हापूर-सांगली मार्गावर पाहायला मिळाला. एका थकलेल्या, अधू पायाने चालणाऱ्या बापाने आपल्या मुलाच्या बदलीसाठी थेट परिवहन मंत्र्यांचा ताफाच अडवला आणि पुढे जे घडले, ते प्रशासनातील मानवतेचा हृदयस्पर्शी अध्याय ठरला.
रुकडी फाट्यावर काही ग्रामस्थांसह उभ्या असलेल्या नायकू गवाणे यांनी आपला मुलगा एसटी चालक अमोल गवाणे याच्या बदलीसाठी कळकळीची विनंती केली. आपल्या उतारवयात आधार असलेला मुलगा जवळ असावा, ही साधी पण अत्यंत भावनिक मागणी त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर मांडली. अमोल गवाणे(Amol Nayaku Gavane) यांच्या कौटुंबिक अडचणी लक्षात घेऊन सिंधुदुर्ग विभागातून कोल्हापूर विभागात बदली करण्याची मागणी केली होती.प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार अमोल नायकू गवाणे यांची बदली त्यांच्या विनंतीनुसार कोल्हापूर विभागात करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी हात दाखवताच मंत्र्यांनी ताफा थांबवण्याचे आदेश दिले. भर उन्हात स्वतः गाडीतून उतरून त्यांनी त्या वृद्ध बापाची व्यथा ऐकून घेतली. त्या क्षणी सत्ता नव्हे, तर संवेदनशीलता बोलत होती. परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तात्काळ एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना फोन करून “ताबडतोब बदलीचे आदेश काढा”असा स्पष्ट निर्देश दिला. आश्चर्य म्हणजे, दुपारी दिलेल्या या आदेशाची पूर्तता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झाली आणि संबंधित विभागाला बदली आदेश प्राप्तही झाला.(Amol Nayaku Gavane)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.