मुंबई : (birth anniversary of the late Jayantrao Sahasrabuddhe) स्व पासूनच ज्ञानाच्या प्रक्रियेची सुरुवात होते. स्व ला प्रतिष्ठित, बलवान करणे हे ज्ञानाचे मूळ कार्य आहे. स्व चे विस्मरण झाले तर अनेक अनर्थ होऊ शकतात. जयंतराव सहस्रबुद्धे स्व बोधचे खरे जाणकार होते. त्यांच्या आचरणातून विज्ञानदृष्टी सहज दिसून यायची. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांनी केले.
विज्ञान भारती, कोकण प्रांत आणि साठ्ये कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. जयंंतराव सहस्रबुद्धे (माजी राष्ट्रीय संघटन मंत्री, विज्ञान भारती) यांच्या जयंतीनिमित्त (birth anniversary of the late Jayantrao Sahasrabuddhe) "भारतीय ज्ञान प्रणाली - 'स्व' भावनेची पुनर्स्थापना" या विषयावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५:३० वाजता साठ्ये कॉलेज ऑडिटोरियम, ग्राउंड फ्लोअर, दीक्षित रोड, विले पार्ले (पूर्व), येथे संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संयुक्त संघटन मंत्री प्रवीण रामदास व विज्ञान भारती कोकण प्रांत कार्यवाह तथा साठ्ये कॉलेजचे प्राचार्य माधव राजवाडे हे देखील उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत प्रमोद बापट पुढे म्हणाले, ज्ञान कृतीच्या मार्गावर प्रकाश दाखवते. माझ्याकडे अधिक ज्ञान असेल आणि मी स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत असेल तर ते उचित ठरत नाही. भारतीय ज्ञान प्रणालीचे भाषांतर करताना 'इंडियन नॉलेज सिस्टीम' असे केले जाते. इथे भारत हे केवळ प्रदेश नसून ते एक विशेषण आहे. त्यामुळे त्याचे भाषांतर हे भारतीयच असायला हवे. (birth anniversary of the late Jayantrao Sahasrabuddhe)
पुढे ते म्हणाले, संगीत कार्यक्रमात गायक, तबला, संवादिनी, व्हायोलीन हे सर्व घटक दिसतात, ऐकू येतात आणि प्रेक्षकांचे लक्ष त्यांच्याकडे जाते. पण तानपूरा मात्र शांतपणे, सातत्याने पार्श्वभूमीत नाद देत असतो. तो थेट लक्ष वेधून घेत नाही, पण गायकासाठी तो अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण तो स्वरांची अचूकता, स्थैर्य आणि दिशा टिकवून ठेवतो. गायकाचे लक्ष सतत त्या तानपुऱ्याकडे असते, कारण त्यावरच संपूर्ण गायनाची पायाभरणी उभी असते. भारतीय ज्ञान प्रणाली ज्यात वेद, उपनिषदे, तत्त्वज्ञान, योग, आयुर्वेद, नाट्यशास्त्र अशा विविध परंपरा येतात ही आपल्या संस्कृतीच्या आणि विचारविश्वाच्या पाठीमागे असलेली 'तानपूरा' आहे. ती रोजच्या जीवनात नेहमी पुढे दिसत नाही, पण आपल्या मूल्यांना, विचारांना, आचरणाला आणि निर्णयक्षमतेला ती सतत दिशा देत असते.
प्रवीण रामदास यांनी जयंतरावांबरोबरच्या आठवणीना उजाळा देत म्हटले की, काही व्यक्ती अशा असतात ज्यांचे जीवन संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी आदर्श असते, सर्वांसाठी एक प्रेरणा म्हणून असते. त्यापैकी एक म्हणजे स्व. जयंतराव सहस्रबुद्धे. ते एक योगीपुरूष होते. राष्ट्रकार्य करायचे म्हणून त्यांनी प्रचारक जीवन सुरू केले. एखादी व्यक्ती स्वतःसाठी किती कठोर असू शकते हे त्यांचे आयुष्य पाहिल्यावर दिसते. त्यांनी संपूर्ण जीवन आपल्या तपस्येचे निर्वाण केले. भारतातील प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वतः रुची ठेऊन एक विशिष्ट नेटवर्क स्थापित केले. त्यांचे जीवन विज्ञान भारतीसाठी एक उदाहरणरूपी आहे. ते आमच्यासाठी आदर्श होते आणि कायम राहतील.
कार्यक्रमादरम्यान भारतीय सौर दैनंदिनीचे प्रकाशन करण्यात आले. भारतीय ज्ञान परंपरेचे पुनरावलोकन करून ‘स्व’भावनेची जाणीव दृढ करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने विविध क्षेत्रातील अभ्यासक, संशोधक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (birth anniversary of the late Jayantrao Sahasrabuddhe)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक