बंगालला घोटाळ्यांत क्रमांक एकवर आणणे, हे ममतादीदी सरकारचे यश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; यावेळी परिवर्तन करून भाजपचे सरकार आणा

    17-Apr-2026   
Total Views |
 
DEVENDRA FADANVIS VS MAMATA BANERJEE
 
कोलकाता :(West Bengal Politics)पश्चिम बंगालला घोटाळ्यांमध्ये क्रमांक एकवर आणणे हे ममतादीदींच्या सरकारची सर्वात मोठे यश आहे. बंगालच्या नागरिकांनी यावेळी परिवर्तन करून पहिल्यांदा भाजपचे सरकार निवडून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंगालच्या जनतेला केले.
 
कोलकाता येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पश्चिम बंगालच्या (West Bengal Politics) निवडणूकीच्या दृष्टीने भाजप ज्याप्रकारे कायम बंगालच्या जनतेचे मन जिंकत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बंगालच्या प्रत्येक क्षेत्रातून ज्याप्रकारे प्रतिसाद मिळत आहे, यामुळे आता या राज्यात परिवर्तन होईल. ही लढाई भाजप विरुद्ध ममतादीदी अशी नसून टीएमसी किंवा ममतादीदी विरुद्ध बंगालची जनता अशी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 'सोनार बांग्ला'चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पश्चिम बंगालची जनता एक नवीन सुरुवात करेल."
 
"देशाच्या सांस्कृतिक राजधानीच्या रुपात आपण बंगालकडे पाहतो. विशेषत: भारताच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनातील बंगालचे योगदान कुणीही विसरू शकत नाही. वंदे मातरमचे स्वर १५० वर्ष पूर्ण करत असून या स्वरांनी संपूर्ण भारताला एक करून लोकांच्या मानसिकतेत परिवर्तन आणले. बंगाली भाषेचा गोडवा आपल्या सर्वांना माहिती आहे. एकेकाळी कोलकाता आणि पश्चिम बंगाल देशाची आर्थिक, वाणिज्यिक आणि उद्योगाची राजधानी होती. सर्वात आधी याच बंगालमध्ये मोठमोठ्या उद्योगांची स्थापना झाली. देशातील यशस्वी उद्योजकांची सुरुवात बंगालपासून झाल्याचे दिसते. त्यामुळे बंगालकडे देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून पाहिले जात होते. परंतू, इथे आधी सीपीएम आणि नंतर ममतादीदींच्या राज्य राहिले. सुरुवातीला आम्ही सीपीएमच्या राज्याची निंदा करत होतो. पण आता ममतादीदींचे सरकार त्यापेक्षाही खाली गेले आहे," अशी टीका त्यांनी केली.(West Bengal Politics)
६ हजार ८९५ उद्योग बंगालमधून बाहेर पडले.
 
 
"मुंबई आणि महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी असल्याचे आपण म्हणतो. परंतू, मुंबईच्या आधी हा दर्जा मिळवणारा कोलकाता आणि बंगाल होते. त्यामुळे ही निवडणूक कुणाला सत्ता देण्याची निवडणूक नाही. बंगालमध्ये हीच परिस्थिती राहिल्यास येणाऱ्या पीढीसाठी काही भविष्य असेल असे वाटत नाही. सप्टेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, ६ हजार ८९५ उद्योग बंगालमधून बाहेर गेले. याबद्दल आनंद व्यक्त करावा की, दु:ख हे कळत नाही. पण बंगालमधून बाहेर पडलेले सर्वाधिक उद्योग महाराष्ट्रात आले. जवळपास १४०० उद्योग बंगालमधून महाराष्ट्रात आले. आपल्या लोकसंख्येपैकी जवळपास ६५ टक्के लोक ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. त्यांच्यासाठी रोजगारनिर्मिती करणे गरजेचे आहे. परंतू, अशाप्रकारे उद्योग परत गेल्यास युवकांना रोजगार कसा मिळणार?" असा सवालही त्यांनी केला.
 
बंगालला औद्योगिक महासत्ता बनवण्याचा प्रयत्न करणार
 
"एक वेळ अशी होती जेव्हा देशातील प्रमुख पाच राज्यांमध्ये बंगाल होते. इथली अर्थव्यवस्था सर्वाधिक विकसिनशील अर्थव्यवस्थांपैकी एक होती. परंतू, आज बंगाल पूर्णपणे कर्जात बुडाले आहे. सरकार केवळ आपल्या मशिनरी चालवत आहे. राज्यात गुंतवणूकीसाठी सरकारकडे कोणतीही योजना नाही. आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे बंगाल ट्रॅपमध्ये जात आहे. इथे नवीन उद्योग येत नाही. तसेच इथल्या सरकारच्या तिजोरीमध्ये येणारा पैसा लुटण्याचे काम सुरु आहे. आता हा गैरकारभार संपवण्याची वेळ आली आहे. भाजपने एक चांगला जाहीरनामा दिला आहे. ज्या राज्यात भाजपचे सरकार आले, ते राज्य देशाच्या अर्थव्यवस्थेचे ग्रोथ इंजिन बनले. बंगालला सुशासन मिळाल्यास ५ ते ७ वर्षात बंगाल पुन्हा देशातील पाच राज्यांमध्ये येऊ शकतो. बंगालला औद्योगिक महासत्ता बनवण्याचा प्रयत्न आम्ही करू. विशेषत: बंगालमधील घुसखोरी रोखण्याचे काम मोदीजींच्या नेतृत्वात होईल," असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.(West Bengal Politics)
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....