राऊतांनी स्वतःच्या राजकीय स्थितीकडे पहावे - नवनाथ बन
17-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Sanjay Raut vs Navnath ban) भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार करताना शुक्रवार दि.१७ रोजी सांगितले की, "भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्यापेक्षा राऊतांनी स्वतःच्या राजकीय स्थितीकडे लक्ष द्यावे. विधानसभेपासून महापालिकांपर्यंत जनतेने दिलेल्या निकालातून त्यांची वास्तविकता उघड झाली आहे. दररोज सकाळी उठून विरोधकांवर खालच्या स्तरावर टीका करणे आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावण्याचे काम राऊत(Sanjay Raut vs Navnath ban) करत आहेत.अशी भाषा आणि शैली जनतेला मान्य नसून, त्याला वेळोवेळी जनता उत्तर देत आहे."
" महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजुरीच्या दिशेने वाटचाल करत असताना हा ऐतिहासिक निर्णय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे स्वप्न साकार होत आहे.काँग्रेससह इतर पक्षांना जे शक्य झाले नाही, ते भाजपा करून दाखवत आहे. तसेच संजय राऊत हे या विधेयकावर विरोधाभासी भूमिका घेत असून, महिलांच्या सशक्तीकरणाला विरोध करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही." असा इशाराही बन यांनी दिला.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत उमेदवारीवरून मोठा संघर्ष सुरू असल्याचा दावा नवनाथ बन यांनी करताना असे प्रतिपादन केले की, "मागील वेळी राष्ट्रवादीला संधी मिळाल्यानंतर यावेळी काँग्रेस उमेदवारीसाठी आग्रही आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना संधी मिळेल का, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. विरोधकांचे संख्याबळ मर्यादित असल्यामुळे फक्त एकाच उमेदवाराचा विजय शक्य असल्याने, ठाकरे यांची विधानपरिषदेतील कामगिरी पाहता, त्यांना पुन्हा संधी मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे." (Sanjay Raut vs Navnath ban)
‘लाडक्या बहिणी’ योजनेवरून भाजपकडून विरोधकांवर जोरदार टीका करताना नवनाथ बन यांनी सांगितले की, " या योजनेमुळे महिलांना सन्मानाने जगण्यासाठी आर्थिक आधार मिळत आहे. मात्र संजय राऊत यांनी ही मदत बंद करण्याची मागणी करून महिलांचा अपमान केला आहे. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांनी दिलेल्या प्रतिसाद पाहता, भविष्यातही अशा भूमिकेला जनता आणि महिलांकडून ठोस उत्तर मिळेल."(Sanjay Raut vs Navnath ban)