श्री .क्षेत्र दाजीपूर येथील स्वामी गगनगिरी आश्रमात सुरू असलेल्या धार्मिक सोहळ्याची रविवारी सांगता

    17-Apr-2026
Total Views |
GAGANGIRI MAHARAJ PROGRAMME
 
कोल्हापूर :(Gagangiri Maharaj Ashram)सालाबाद प्रमाणे याही वर्षी स्वामी गगनगिरी महाराजांचे प्रेरणा-आशीर्वादाने दाजीपूर येथील सुरू असलेल्या महाराजांच्या तपोस्थानातील अर्थात पडसाळी किटाचे-रान,ता.राधानगरी,जिल्हा-कोल्हापूर येथील आश्रमांतील सुरू झालेल्या धार्मिक सोहळ्याची रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी सांगता होणारआहे.
 
या निमित्ताने मानव कल्याणासाठी व जगामध्ये शांतता नांदावी,यास्तव शतचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा शुभारंभ नुकताच मठाधिपती आझादगिरी महाराज यांचे हस्ते यथासांग पूजन करून सोमवार दिनांक 13 एप्रिल ला पार पडला.
सदरहू धार्मिक सोहळ्याची रविवार रोजी अक्षयतृतीयेचे पावन दिनी सांगता होणार आहे.
 
या शतचंडी महायज्ञाचे यजमान जयेश झाला आणि परिवार असून या देवीचे पाठ-हवनास स्वामी गगनगिरी महाराज भक्त मंडळी बहुसंख्येने उपस्थित राहत आहेत. सदरहू धार्मिक सोहळा हा रविवार दिनांक 19 एप्रिल पर्यत सुरू राहणार असून अक्षयतृतीयेचे पावन दिनी या हवनाची पूर्णाहूती होईल. या मंगल दिवशी आश्रमात पहाटेपासून स्वामी गगनगिरी महाराज मूर्तीस अभिषेक-पुजन व मंगलस्नान घालण्यांत येईल.नतंर दूर्गाअभिषेक,पूजा करण्यात येईल.
 
हेही वाचा :  Gold rate today: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत स्फोट! खरेदी करावी की थांबावं?
 
सदर हवनाची पूर्णाहूती आश्रमात (Gagangiri Maharaj Ashram) आलेल्या साधु-संत मंडळींकडून व परिसरातील भाविक मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात येणार आहे.तदनतंर कुमारिका-पुजन कार्यक्रम संपन्न होईल.सदरहू कार्यक्रमास श्री क्षेत्र गगनगडाचे ट्रस्टी श्री.संजयसिंह पाटणकर,श्री.रमेशदादा माने,त्याचबरोबर स्वामी गगनगिरी महाराजांचे (Gagangiri Maharaj Ashram)विविध आश्रमाचे मठाधिपती, उल्हासगिरी महाराज,सदानंदगिरी महाराज, उंबरनाथगिरी महाराज,दिपकगिरी महाराज तसेच परिसरातील अनेक मान्यवर व गगनगिरी भक्त मंडळी बहूसंख्येने उपस्थित राहणार आहेत.
 
यावेळी सायंकाळी " माता की चौकी हा देवी जागरणाचा कार्यक्रम मोहन सावंत,मुकेश तलरेजा,मीना दिदी आणि भक्तमंडळीचे साथीनै सादर करण्यात येईल. यावेळेस देवीला छपन्न-भोग नैवेद्य अर्पण करण्यात येईल. तरी या धार्मिक कार्यक्रमात जास्तीतजास्त भाविक मंडळीनी उपस्थित राहून दर्शन-आशिर्वादाचा लाभ घ्यावा,व सक्रिय सहकार्य करावे,असे आवाहन मठाधिपती आझादगिरी महाराज व अन्नपूर्णा वासंतीताई यांनी केले आहे.(Gagangiri Maharaj Ashram)