North Korea Nuclear Threat : उ. कोरियामधील वाढती अण्वस्त्रे जगासाठी धोकादायक!

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनेचा इशारा

    16-Apr-2026
Total Views |
North Korea Nuclear Threat
 
सेऊल : (North Korea Nuclear Threat) उत्तर कोरिया अण्वस्त्रांमध्ये वाढ करत असल्याचा धोक्याचा इशारा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने दिला आहे. उत्तर कोरियाने केलेली ही वाढ अत्यंत धोकादायक असल्याचे सांगत, या संस्थेने जगाचे लक्ष वेधले आहे. हुकुमशाही राजवट असलेला उत्तर कोरिया हा देश अण्वस्त्रांमध्ये सातत्याने वाढ करत असून, ही वाढ जगासाठी एक समस्या असल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख असलेल्या राफेल ग्रोसी यांनी म्हटले आहे. उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमाचे प्रमुख केंद्र असलेल्या योंगब्योन केंद्रातील हालचालींचे निरीक्षण केले असता, या निष्कर्षापर्यंत पोहोचता येते, असे अलीकडेच सेऊलच्या दौर्‍यावर असताना ग्रोसी यांनी म्हटले आहे.(North Korea Nuclear Threat)
 
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने उत्तर कोरियाच्या योंगब्योन केंद्रात असलेल्या अणुभट्टीच्या प्रगतीचे निरीक्षण करुन, या भट्टीच्या प्रगतीचा वेग संस्थेच्या आदर्श मूल्यांकनापेक्षा अधिक असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. या संस्थेने केलेल्या निरीक्षणामध्ये पाच मेगावॅटच्या अणुभट्टीबरोबरच, पुनर्प्रकिया आणि हलक्या पाण्यातील अणुभट्ट्यांच्या विकासानेही गती पकडल्याचे या संस्थेने म्हटले आहे.(North Korea Nuclear Threat)
 
त्याचबरोबर उत्तर कोरिया प्ल्युटोनियमच्या पुनर्प्रक्रियेसोबतच अणुसंवर्धनासाठी सुविधा निर्माण करत असून, हे त्यांच्या दीघकालीन अण्वस्त्र निर्मितीचे लक्ष्य असल्याचे सूचक असल्याचे मतही ग्रोसी यांनी व्यक्त केले. 2009 मध्ये उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या निरीक्षकांना देशाबाहेर काढत प्रवेशबंदी केल्याने, उत्तर कोरियामध्ये प्रत्यक्ष प्रवेश करुन त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमांची चाचपणी करणे शक्य नसून, ती करण्यासाठी बाह्य निरीक्षण आणि उपग्रह यांचाच आधार घ्यावा लागतो. मात्र, उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमांसाठी रशिया मदत करत असल्याचे आढळून आले नसल्याचेही संस्थेने स्पष्ट केले आहे.
(North Korea Nuclear Threat)
 
हेही वाचा : TCS Nashik case: TCS प्रकरणात धक्कादायक उलगडा! महिला कर्मचाऱ्यांच्या शोषणापासून थेट दहशतवादी कनेक्शन…? एटीएसच्या तपासात नेमकं काय?
 
अणुसंवर्धन म्हणजे काय?
 
अणुसंवर्धन (युरेनियम इन्रिचमेंट) म्हणजे नैसर्गिक युरेनियममधील ‘युरेनियम-235’ या आयसोटोपचे प्रमाण वाढवण्याची प्रक्रिया होय. नैसर्गिक युरेनियममध्ये ‘युरेनियम-235’चे प्रमाण खूप कमी म्हणजे जवळपास 0.7 टक्के इतके असते. हे प्रमाण आण्विक ऊर्जा किंवा अण्ववस्त्रनिर्मितीसाठी पुरेसे नसते. ‘सेंटरफ्युज’ यंत्राद्वारे ‘युरेनियम-238’ पासून ‘युरेनियम-235’ वेगळे करून हे प्रमाण वाढवले जाते.(North Korea Nuclear Threat)
 
उत्तर कोरियातील अण्वस्त्रागाराबाबत...
 
उत्तर कोरिया सातत्याने अणवस्त्रांमध्ये वाढ करत असून, सद्यस्थितीमध्ये त्यांच्याकडे 50 अण्वस्त्रे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, ही अण्वस्त्रे आकाराने लहान असून, कोणत्याही बॅलेस्टिक क्षेपणास्त्रावर बसवता येणारी आहेत, असे मत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.(North Korea Nuclear Threat)