मुंबई : (Nashik Corporate Jihad) नाशिकच्या एका आयटी कंपनीतील कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या कथित धर्मांतर प्रकरणाचा मोठा भांडाफोड झाला असून, आता या प्रकरणाला एक नवीन आणि धक्कादायक ‘आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी’चा कोन समोर आला आहे. तपास करणाऱ्या एसआयटीला संशय आहे की आरोपींचा उद्देश केवळ धर्मांतर घडवून आणणे नव्हता, तर ‘मलेशिया प्लॅन’च्या माध्यमातून पीडितांना परदेशात पाठवण्याची तयारी सुरू होती. आतापर्यंत या प्रकरणात ६ आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण ९ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.(Nashik Corporate Jihad)
या कंपनीत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर आरोप आहे की ते एका संघटित टोळीप्रमाणे कनिष्ठ हिंदू मुलींचे ब्रेनवॉश करत होते. पुढे असेही लक्षात आले की, आरोपींचे धागेदोरे मलेशियाशी जोडलेले होते आणि ते पीडितांचे पासपोर्ट तयार करून त्यांना परदेशात पाठवण्याच्या तयारीत होते. या मागे एखादे मोठे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे जाळे कार्यरत आहे का, याचीही पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. व्हॉट्सअॅप चॅटमधून ‘इमरान’ नावाचा व्यक्ती परदेशातून व्हिडिओ कॉलद्वारे निर्देश देत असल्याचे उघड झाले आहे. एचआर अधिकारी निदा खान हिच्यावर या टोळीतील प्रमुख दुवा असल्याचा आरोप असून, भरती प्रक्रियेत एक ठराविक पद्धत अवलंबली जात असल्याचेही समोर आले आहे. पोलिस आता या प्रकरणाचा आर्थिक (फंडिंग) कोनातूनही तपास करत आहेत.(Nashik Corporate Jihad)
सत्य समोर आणण्यासाठी पोलिसांनी चार महिला कॉन्स्टेबल्सना हाउसकीपिंग कर्मचारी म्हणून कॅम्पसमध्ये नियुक्त केले होते. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सदर आयटी कंपनीने निवेदन जारी करून तक्रारींना गांभीर्याने घेतल्याचे सांगितले असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या ६ आरोपी तुरुंगात असून तपास सुरू आहे.(Nashik Corporate Jihad)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक