परी बिंदी हाऊस - लव्ह जिहाद’ संपले नाही, तोवर नाशिकचे ‘कॉर्पोरेट लव्ह जिहाद’. हे सुरू असतानाच आता अमरावतीच्या मोहम्मद अयाज या नराधमाने एक नाही, दोन नाही, तर तब्बल 180 मुलींना जाळ्यात ओढले, तर दुसरीकडे कर्नाटकच्या कोप्पल येथे मुस्तपा खद्री याचे 16 हिंदू मुलींसोबत आक्षेपार्ह स्थितीतले सहा हजार, 700 व्हिडिओ आणि दहा हजार फोटो सापडले आहेत. किड्यामुंग्यांनी मरावे, तसे घाऊक पद्धतीत हिंदूंच्या मुली-लेकीसुना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात फसत आहेत, बळी जात आहेत.
अनेकदा असे दिसते की, मुली स्वतःच या सर्व शोषणाला कळत-नकळत आमंत्रण देतात आणि त्यात त्यांच्या पालकांचेही या बरबादीत योगदान मोठेच असते. ‘माझी मुलगी लाडकी आहे, तिच्या मनाविरुद्ध काही घडू देणार नाही,’ हे कन्याप्रेम योग्य असेलही; पण लाडक्या मुलींचे भावविश्व-भविष्य मौल्यवान आहे. त्यामुळे मुलींचे लाड करण्याबरोबरच तिला जगाचे वास्तव समजवण्याचे कामही पालकांचेच. आपला काळजाचा तुकडा उद्या शब्दुल-पब्दुलच्या नादी लागून पॉर्न साईटवर झळकावी किंवा वेश्या व्यवसायात ढकलली जावी, असे कुणाही पालकांना वाटत नाही. पण, दुर्दैवाने हे प्रमाण वाढत आहे. काय करावे? तर, अपत्यासोबत किमती वेळ आणि आपुलकीचा मायेचा संवाद साधणे क्रमप्राप्त. त्याचबरोबर त्यांचे शोषण करणाऱ्यांचा बंदोबस्त करणेही गरजेचे. आपण हिंदू मुलींना फसवून पुण्य करतो, मेल्यावर आपल्याला जन्नत मिळेल, हे जर एखाद्या बालकाला नकळत्या वयापासून शिकवले गेले, त्यापलीकडच्या जगाची दारे त्याच्यासाठी बंद केली गेली, तर ते बालक हिंदू मुलींना फसवण्यासाठी, त्यांचे शोषण करण्यासाठीच आपला जन्म झाला, हेच मानणार! शोषण करणारे ते नराधम नीच आहेतच; पण त्यांची मानसिकता घडवणारी जी त्यांची यंत्रणा आहे, ती मुळासकट नष्ट करायला हवी. मृत्यूनंतर स्वर्ग मिळावा म्हणून हे केलेच पाहिजे, हे त्या नालायकांना जे सांगतात, त्यांच्यावर आधी कारवाई झालीच पाहिजे. ‘गझवा-ए-हिंद’चे स्वप्न पाहणारा औरंगजेब या महाराष्ट्राच्या मातीतच गाडला गेला. त्यामुळे या ‘लव्ह जिहाद’ करणाऱ्यांचीही गत अशीच केली जाईल. हे ‘गझवा-ए-हिंद’ करण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ करायला हवाच, असे जे मानतात त्यांना आता कठोरपणे कृतीतून दाखवून द्यायला हवे.
असंवेदनशील राजकारण
मला अशाप्रकारे ट्रोल केले आहे की, जणू मी देशद्रोह केला आहे. माझ्या गाण्याची निवड चुकली आहे. मी ‘अभाविप’ किंवा ‘एनएसयू’ कुणालाही ओळखत नाही,” असे म्हणत ‘ती’ मुलगी ढसाढसा रडत होती. तिने ‘धक धक करने लगा’ या गाण्यावर नृत्य केले. यावर ‘अभाविप’च्या व्यासपीठावर अलील नृत्य... अलील नृत्य म्हणत, काँग्रेसवाल्यांच्या ‘एनएसएनयू’ने धडाधड समाजमाध्यमांवर पोस्ट टाकल्या. अर्थात, प्रत्येक स्थानाचे एक महात्म्य असते. त्याचे भान आयोजकांनी राखायलाच हवे होते, याबाबत दुमत नाही. या घटनेमध्येही ‘अभाविप’ने ते भान राखणे गरजेचे होते. असे असले, तरीही या घटनेत त्या मुलीला ज्या पद्धतीने ट्रोल केले गेले, ते अजिबात समर्थनीय नाही.
तसेही भाजप, रा. स्व. संघाशी संबंधित कुणी म्हणाले, ‘विष पिऊन माणूस मरतो’, तर काँग्रेसवाले भाजपला विरोध म्हणून विषही प्यायलाही कमी करणार नाहीत, ही स्थिती. त्यामुळेच या मुलीच्या नृत्यावरून काँग्रेसने ‘अभाविप’ला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. असो. सध्या तीन-चार वर्षांच्या बालिका/बालकही अलील हावभाव करून नाचतात आणि बहुतेकदा आपल्या डोळ्याला-मनालाही हे खटकत नाही. कारण, आपल्या संवेदना विस्तारल्या आहेत. (की, बोथट झाल्या आहेत?) लहान मुली जेव्हा ‘आज की रात मजा हुस्न का आँखों से लिजिए’ म्हणत, कंबर 360 कोनातून लचकवतात, तेव्हा हे अलील आहे असे न म्हणता, ‘अरे वा, कसं करत असेल ही?’ असे म्हणणारे बहुसंख्य लोक आहेत. हा बदल समाजात झाला आहे. मला आठवते, माधुरी दीक्षितला ‘तेजाब’मध्ये ‘एक दो तीन... चार पाच छे सात...’ गाण्यावर कंबर पाठीमागे झटकतानाचे नृत्य करताना पाहून तेव्हा अनेक महिलांनी शरमेने नजर खाली झुकवली होती. कारण, कंबर डावीकडे-उजवीकडे झुकवायची हे नृत्य असते, असेच समीकरण तोपर्यंत होते. आता त्याही पलीकडे पाणी बरेच पुलाखालून गेले आहे. नृत्याच्या नावाखाली बरेच काही आक्षेपार्हही असते. त्यामुळे त्या मुलीने त्या व्यासपीठावर ‘धक धक करने लगा’वर जे नृत्य केले, त्याचे समर्थन नसले; तरीसुद्धा तिला अगदी संस्कृतीभंजक वगैरे दूषण देणे, हेसुद्धा योग्य नाही. स्वप्न बघण्याचे वय असणाऱ्या त्या मुलीला काँग्रेसच्या ‘एनएसयू’ने त्यांच्या असंवेदनशीलतेच्या राजकारणाचे लक्ष्य बनवू नये.
9594969638