Minister Mangal Prabhat Lodha : राज्यात प्रथम टप्प्यात शंभर 'महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र' होणार सुरू - मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई शहर व उपनगर मध्ये कौशल्य प्रशिक्षण केंद्रासाठी जागा उपलब्ध करणार

    16-Apr-2026
Total Views |
 
Mangal Prabhat Lodha
 
मुंबई : (Minister Mangal Prabhat Lodha) कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात युवक-युवतींसाठी महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र प्रथम टप्प्यात शंभर केंद्र सुरू करण्यात येणार आहेत आगामी काळात राज्यात या कौशल्य विकास केंद्रांची एक हजार पर्यंत ही संख्या वाढविणार आहोत.ही योजना मुंबई महापालिका क्षेत्रात ही मुंबई शहर व उपनगर मध्ये राबविण्यात येणार आहे.महानगरपालिकेमार्फत या कौशल्य केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती आयुक्तांना पत्राद्वारे करण्यात आली आहे अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.(Minister Mangal Prabhat Lodha)
 
मुंबई महानगरपालिकेत आयोजित पत्रकारांशी संवाद साधताना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते.महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचीही भेट त्यांनी घेतली. या भेटीदरम्यान मुंबईच्या विविध समस्यांसह तरुणांच्या रोजगारासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.(Minister Mangal Prabhat Lodha)
 
मंत्री मंगल प्रभात लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करणे या योजनेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणासोबत कौशल्याची सांगड घालण्यात येणार आहे.झोपडपट्टी परिसरातही ही प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. शहरी भागात आवश्यक असलेले कौशल्य शिकविण्यात येतील. पदवी सोबत कौशल्य अवगत असेल तरच रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होतील. हँगिंग गार्डन (फिरोजशहा मेहता गार्डन) येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी रॅम्प तयार करणे, सायन येथील 'अम्मान देखनी' संस्थेजवळील डीपी रोडवर झालेले अतिक्रमण हटवून तो रस्ता रहिवाशांसाठी मोकळा करावा, याबाबत मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली.मुंबईतील पायाभूत सुविधा आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकार मिळून काम करतील, असा विश्वास यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.(Minister Mangal Prabhat Lodha)