KDMC Surgical Strike : नियम मोडला तर खैर नाही! उर्सेकर वाडी भाजी मंडईत केडीएमसीचे 'सर्जिकल स्ट्राईक'
16-Apr-2026
Total Views |
डोंबिवली : (KDMC Surgical Strike) डोंबिवलीच्या उर्सेकर वाडी भाजी मंडईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC Surgical Strike) बुधवारी जोरदार दणका दिला. भाजी विक्रेत्यांसाठी आरक्षित असलेल्या जागेत इतर व्यवसाय थाटणाऱ्या गाळेधारकांविरोधात पालिकेने धडक कारवाई करत गाळे सील केले. यावेळी गाळेधारकांनी प्रशासनाला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधाला न जुमानता पालिकेने आपला बडगा उगारल्याने गाळेधारकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी १११ पैकी ८० गाळेधारकावर कारवाई करण्यात आली.(KDMC Surgical Strike)
केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार महापालिकेचे प्रभागक्षेत्र अधिकारी प्रसाद ठाकूर, भारत पवार यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. कारवाई दरम्यान गाळेधारकांनी आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता गाळे सील के ले जात आहेत. आम्ही याठिकाणी गेल्या वीस वर्षापासून व्यवसाय करत आहे. त्यासाठी महापालिकेला रीतसर पावती फाडून भाडे देखील भरतो. ही भाजी मंडई असली तरी भाजीविक्रेते मंडईत व्यवसाय करत नाही. भाजीविक्रेते रस्त्यावर व्यवसाय करतात. ते भाजीमंडईत व्यवसाय करत नसल्याने गेल्या वीस वर्षापासून आम्ही याठिकाणी व्यवसाय करत आहे. आमच्या गाळेधारकांवर कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने सूचना देणे गरजेचे होते. त्यावर कि मान तीन दिवसांची मुदत गाळेधारकांना देणे गरजेचे होते. परंतु असे काही ही न होता महापालिकेने डायरेक्ट कारवाई केली आहे. आमच्या व्यवसायावर यामुळे गदा आली आहे. आम्ही काय खायचे असे अनेक प्रश्न विचारत गाळेधारकांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यावर प्रभागक्षेत्र अधिकारी प्रसाद ठाकूर यांनी महापालिका आयुक्तासोबत एक बैठक लावतो असे आश्वासन गाळेधारकांना दिले आहे.(KDMC Surgical Strike)
प्रसाद ठाकूर म्हणाले, शहराच्या पूर्व भागात उर्सेकर भाजीमंडई असून त्यातील विविध गाळे हे विविध प्रकारच्या व्यवसायासाठी वापरले जात असल्याचे निर्देशनास आले आहे. त्यासंदर्भात महापालिकेत शनिवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत भाजीविक्रेत्या व्यतिरिक्त अन्य वापरासाठी गाळे वापरले जात असतील तर त्यांना सील करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्यांच्या आदेशानुसार ही कारवाई होत आहे.(KDMC Surgical Strike)