CM Devendra Fadnavis : आदिवासीबहुल विभागासाठी ६ रुग्णवाहिकांचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
रायगड प्रतिष्ठानतर्फे ६ संस्थांना रुग्णवाहिकांच्या देखभाल दुरुस्तीकरिता प्रत्येकी १ लाखाचा धनादेश
16-Apr-2026
Total Views |
मुंबई : (CM Devendra Fadnavis) भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर आणि स्व. लिलाराम जांगिड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रातील आदिवासीबहुल भागात राहणाऱ्या आदिवासी पाड्यांसाठी द्यावयाच्या ६ रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थानी पार पडले.
या लोकार्पण सोहळ्याला वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित, आमदार परिणय फुके, मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, रायगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. यश प्रविण दरेकर यांसह श्रमजीवी संघटनेचे विजय जाधव, शांताई ट्रस्टचे गणेश चव्हाण, द रिसर्च ऑर्गनायझेशनचे अमित तोतला, कालकाई सामाजिक शिक्षण संस्थेचे सुयोग दरेकर, संजय गांधी नॅशनल पार्क येथील गणेश ताटे, किरण पाटील, सिद्धिविनायक रुग्णालयाचे डॉ. अमोल गिते हे प्रतिनिधी उपस्थित होते.
रुग्णवाहीका लोकार्पण सोहळ्यानंतर बोलताना भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर म्हणाले की, राज्यातील आदिवासीबहुल विभागात रुग्णवाहीका उपलब्ध होत नाहीत अशा विभागात ‘देवाभाऊ रुग्णसेवा’ (CM Devendra Fadnavis) या नावाखाली ६ रुग्णावाहिकांचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. नंदुरबार येथील शांताई ट्रस्ट, चंद्रपूर-गडचिरोली येथील द रिसर्च ऑर्गनायझेशन, पालघर येथील श्रमजीवी संघटना, शहापूर व संजय गांधी नॅशनल पार्क मधील आदिवासी पाडे आणि रायगड जिल्ह्यातील काळकाई माता क्रीडा मंडळ, अशा ६ संस्थांना ६ रुग्णवाहीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. या संस्थांनी रुग्णवाहीका आपल्या ताब्यात घेऊन रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत झाल्या असल्याचेही दरेकर म्हणाले.
रायगड प्रतिष्ठानतर्फे ६ संस्थांना रुग्णवाहिकांच्या देखभाल दुरुस्तीकरिता प्रत्येकी १ लाखाचा धनादेश
रायगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. यश प्रविण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड प्रतिष्ठानकडून नंदुरबार, चंद्रपूर-गडचिरोली, पालघर, शहापूर येथील सिद्धिविनायक रुग्णालय, बोरिवली नॅशनल पार्क येथील आदिवासी पाडे आणि रायगड येथील काळकाई माता क्रीडा मंडळ अशा ६ संस्थांना रुग्णवाहिकांच्या देखभाल दुरुस्तीकरिता प्रत्येकी १ लाख रुपयाच्या धनादेशाचे वाटपही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.